नाशिक

शिरपूर : मेंढ्या चोरी बातमी

CD
सावळदे येथून साडेसहा लाखांच्या मेंढ्यांची चोरी 13536 सावळदे (ता.शिरपूर) : मेंढ्या चोरण्यासाठी चोरट्य़ांनी कापलेली जाळी सावळदे येथून ४२ मेंढ्यांची चोरी सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २४ : शेतात जाळी लावून कुंपणात बंद केलेल्या ४२ मेंढ्या चोरट्य़ांनी चोरुन नेल्याची घटना सावळदे (ता.शिरपूर) येथे शनिवारी (ता.२४) सकाळी उघडकीस आली. सावळदे शिवारातील सुभाष छगन पाटील यांच्या शेतात ही घटना घडली. शेतातून चोरट्य़ांनी बापू काशीराम भोरकर (वय ५०, रा.वाघापूर ता.साक्री) यांच्या मालकीच्या मेंढ्या तेथून चोरीस गेल्या. श्री भोरकर कुटुंबासह दोन दिवसांपासून मेंढ्या चराईसाठी सुभाष पाटील यांच्या शेतात दाखल झाले आहेत. तेथे झोपडी बांधून मुक्कामी थांबत त्यांनी मेंढ्यांसाठी जाळीचे कुंपण लावून तात्पुरता वाडा केला आहे. भोरकर यांनी शुक्रवारी (ता.२३) रात्री २५० मेंढ्या चारून आणल्यानंतर त्यांनी कुंपणात बंदिस्त केल्या. रात्री जेवण करून भोरकर कुटुंब झोपी गेले. शनिवारी सकाळी उठून मोजणी केल्यावर एका वाड्यातील ४२ मेंढ्या चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यांची किंमत सुमारे सहा लाख ३० हजार रुपये आहे. मेंढ्या कमी असल्याचे कळताच भोरकर यांनी परिसरात शोध घेतल्यानंतरही मेंढ्यांचा मागमूस लागला नाही. घटनास्थळाजवळ वाहनाच्या टायरच्या खुणाही आढळल्या. चोरट्य़ांनी वाड्याची जाळी कापून मेंढ्या चोरल्याचे आढळले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून संशयितांचा शोध घेण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Latest Marathi News Live Update : नवजात बाळाचा मृत्यूनंतर काही दिवसांतच मातेचाही मृत्यू

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

SCROLL FOR NEXT