नाशिक

मुक्त विद्यापीठास शेखर मुंदडा यांची भेट

CD
फोटो -NSK26H34399 नाशिक : महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा व डॉ. शामकांत पाटील यांचे मुक्त विद्यापीठात स्वागत करताना कुलसचिव डॉ. सुरेंद्र पाटोळे, डॉ. नितीन ठोके, डॉ. श्याम पाटील, राजाराम पाटील, हेमराज राजपूत, डॉ. प्रकाश कदम, मंगेश व्यवहारे. मुक्त विद्यापीठास शेखर मुंदडा यांची भेट सकाळ वृत्तसेवा नाशिक , ता. ३ : महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आणि पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त तथा आयोगाचे सदस्य सचिव डॉ. शामकांत पाटील यांनी विद्यापीठास भेट देऊन प्रस्तावित देशी गोसंगोपन व प्रशिक्षण केंद्राच्या आराखड्याची पाहणी केली. देशी गोवंशाचे संवर्धन, शास्त्रीय पद्धतीने संगोपन तसेच पशुपालकांना आधुनिक पशुपालनाचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये देशी गोसंगोपन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार या प्रकल्पाचे काम प्रस्तावित आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठास भेट देऊन प्रकल्पाच्या नियोजनासंदर्भात आवश्यक मार्गदर्शन केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धन व शास्त्रीय गोसंगोपनाला प्रोत्साहन मिळेल. या दृष्टीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून प्रकल्पास आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन आयोगाचे अध्यक्ष मुंदडा आणि सदस्य सचिव डॉ. शामकांत पाटील यांनी दिले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र पाटोळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. नितीन ठोके, पशुसंवर्धन शास्त्रज्ञ डॉ. श्याम पाटील, राजाराम पाटील, हेमराज राजपूत, डॉ. प्रकाश कदम आणि मंगेश व्यवहारे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT