नाशिक

शेळगाव पूर्ण भरण्यापासून पुन्हा वंचित

CD
टुडे १, मेन (आकर्षक पद्धतीने सेट करणे) एक फोटो मोठा वापरावा) ---- लोगो : सकाळ exclusive ----- NSK26H31581 शेळगाव बॅरेज परिसरात सुरू असलेल्या पुलाचे काम. ---- NSK26H31607 यावल तालुक्यासह भुसावळ शहर व परिसरासाठी संजीवनी ठरणारा शेळगाव प्रकल्प. -------- रस्ते, पुलाच्या कामामुळे ‘शेळगाव’ पूर्ण भरलेच नाही उपशीर्षक रखडलेल्या कामांचा फटका; ऐन दुष्काळातही प्रकल्प पाणी वापराविना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : भुसावळसह यावल तालुक्याला आणि जळगाव एमआयडीसीसाठी उपयुक्त ठरू शकणारे तापी नदीवरील शेळगाव बॅरेज पूर्ण होऊन चार वर्षे झालीत. बॅरेजमध्ये साठा करण्याच्या निकषानुसार यंदा त्यात १०० टक्के पाणी अडविणे गरजेचे होते. या वर्षी कमी पाऊस होऊनही हतनूर धरणातून व पर्यायाने तापी नदीतून ९० टीएमसी पाणी वाहून गेले. मात्र, प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील रस्ते व वरच्या भागातील पुलाच्या रखडलेल्या कामामुळे शेळगावमध्ये १०० टक्के पाणी अडविले गेले नाही. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा देशभरात आणि राज्यातही दुष्काळाचे सावट आहे. सप्टेंबरअखेर पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे. पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्यही निर्माण झाले असून येणाऱ्या काळात भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. असे असताना पाण्याचा एकेक थेंब अडविण्याची गरज होती आणि त्यादृष्टीने उपाय करणे अपेक्षित असताना शेळगाव बॅरेजमध्ये अपेक्षित पाणी अडविण्यात आले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हतनूरच्या खालचा महत्त्वाचा प्रकल्प तापी नदीवर जळगाव जिल्ह्यात हतनूरच्या खाली असलेले जळगाव- यावल तालुक्याच्या सीमेवरील शेळगाव बॅरेज हा महत्त्वाचा प्रकल्प. ११ टीएमसी क्षमता असलेल्या या प्रकल्पास १९९९ मध्ये मंजुरी मिळाली. मात्र, अनेक वर्षे रखडलेले हे बॅरेज पूर्ण होण्यासाठी दोन दशकांपेक्षा अधिक काळ लागला. केंद्राच्या बळीराजा संजीवनी योजनेत समावेश झाल्यानंतर २०२२ मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले. प्रकल्प पूर्ण झाला असला तरी, त्यावरील उपसा सिंचन योजनेचे काम अद्याप बाकी असून त्यासाठी १४०७ सुधारित प्रशासकीय मान्यता गेल्या वर्षीच मिळाली आहे. चार वर्षांनंतरही पूर्ण साठा नाहीच पाटबंधारे विभागांतर्गत धोरणानुसार एखाद्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वर्षी ४० टक्के, दुसऱ्या वर्षी ५० टक्के, तिसऱ्या वर्षी ७५ टक्के आणि चौथ्या वर्षापासून त्यात १०० टक्के पाणी अडविणे गरजेचे असते. मात्र, शेळगाव बॅरेज २०२२ मध्ये पूर्ण झाल्यानंतर, यंदा त्यात १०० टक्के पाणीसाठी करून घेणे अपेक्षित असताना आजच्या तारखेपर्यंत ते केवळ ७० टक्केच भरले आहे. विशेष म्हणजे हतनूर धरणातून यंदा ९० टीएमसी पाण्याचा विसर्ग झालांय, मात्र हे पाणी शेळगावमध्ये न अडविता ते सोडून देण्यात आले. ----- (चौकट) पाणीसाठा करण्यात या आहेत अडचणी मुळात, हतनूर धरणाच्या खाली तापी नदीवर असलेला हा पहिलाच प्रकल्प. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी त्यावरील उपसा सिंचन योजनेचे काम अपूर्णच आहे. प्रकल्पाच्या पाणीसाठ्यालगत बुडीत क्षेत्रात रस्त्यांची कामे सुरू आहे. तसेच प्रकल्पाच्या वरच्या भागातील पुलाचे कामही सुरू आहे. पुलाचे काम सुरू होऊन पाच वर्षे झालीत, पण ते अद्याप पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराला या रखडलेल्या कामावरून नोटीस बजावून दंडही आकारण्यात आला आहे. शिवाय, बॅरेजमधील पाण्याचा वापर सुरू झालेला नाही, त्यामुळे पूर्ण पाणीसाठा करणे अशक्य होत आहे. ------- (चौकट) प्रकल्पातील पाणीसाठा यासाठी आहे महत्त्वाचा हा प्रकल्प तापीवरील जिल्ह्यातील हतनूरनंतरचा दुसरा प्रकल्प आहे. त्याखाली निम्न तापी, म्हणजेच अमळनेर तालुक्यातील पाडळसरे प्रकल्प. तो अपूर्ण असल्याने त्याठिकाणी पाणीसाठा होऊ शकत नाही. पुढच्या टप्प्यात धुळे जिल्ह्यातील सुलवाडे- जामफळ, नंतर सारंगखेडा व पुढे प्रकाशा बॅरेज आहे. जळगाव जिल्ह्यात पाणी अडवून उपयोगात आणता येईल, असा तापी नदीवरील केवळ हतनूर प्रकल्पच आहे. शेळगाव बॅरेजवर यावल, भुसावळ तालुक्यातील शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. भुसावळ व जळगाव औद्योगिक क्षेत्राला, रेल्वेलाही पाणी मिळू शकेल. भुसावळ शहराची प्रस्तावित पाणीपुरवठा योजनाही शेळगाववर अवलंबून आहे. असे असताना त्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होऊन त्याचा वापर गरजेचा होता. पण, यंदाही हे काम होऊ शकलेले नाही. ---------- दृष्टिक्षेपात शेळगाव बॅरेज धरणाचा प्रकार : बॅरेज प्रकल्पास मंजुरी : १९९९ नवीन ‘सुप्रमा’ : १४०७ कोटी प्रकल्पाची क्षमता : ११ टीएमसी सिंचन क्षमता : ९ हजार हेक्टर पाणीवापर प्रस्तावित : भुसावळ शहर, एमआयडीसी, रेल्वे, जळगाव एमआयडीसी आजची पातळी : १७६.८०० साठ्याची टक्केवारी : ७०.७३ ---------- कोट.. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात रस्त्यांची कामे सुरू आहे. तसेच ‘अपस्ट्रीम’ला पुलाचे काम सुरू असल्याने या प्रकल्पात १०० टक्के पाणी अडविणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. तरीही १५ ऑक्टोबर या डेडलाईनपर्यंत ८० टक्क्यांवर साठा होऊ शकेल. सध्या प्रकल्पावरील पाणीवापरही नाही. कालवा सल्लागार समितीची बैठक पुढील आठवड्यानंतर होईल, त्यात जे धोरण ठरेल त्यानुसार पाण्याचे नियोजन केले जाईल. - नीलेश अहिरे कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग ---------- कोट.. शेळगाव बॅरेजमध्ये पाण्याची आवक अद्याप सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रकल्पात १०० टक्के साठा होईल. प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनेचे काम बाकी आहे. प्रकल्पातील पाणीवापर सुरू झाला नसला तरी, अप्रत्यक्ष लाभ मोठ्या प्रमाणात झाला आहे. या संपूर्ण परिसरातील भूजल पातळी लक्षणीय वाढली असून त्याचा दुष्काळाच्या स्थितीत लाभ होणार आहे. प्रलंबित कामांसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. - अमोल जावळे आमदार, रावेर -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''माझ्याविरोधात 45 एफआयआर आहेत, 100 पाहिजेत...'' राहुल गांधींनी सुरु केला रस्त्यावरचा एल्गार

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरकडे निघालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी अडवले; राहुल गांधी, प्रियंका गांधी ताब्यात

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

DCM Sunetra Pawar : दुष्काळाची जाणीव ठेवा; ऊस जगविण्याचे आव्हान मोठे

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

SCROLL FOR NEXT