टुडे ४ : मेन फिचर
----
NSK26H32987 : शेळगाव बॅरेजचे संग्रहित छायाचित्र
--
‘शेळगाव’ची मजल यंदा ८० टक्क्यांपर्यंतच
उपशीर्षक
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये गत वर्षाच्या तुलनेत ५ टक्के कमी साठा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : यंदा ‘एल निनो’च्या प्रभावाने दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असताना शेळगाव बॅरेजचे गेट वेळीच बंद न केल्याने या प्रकल्पात अपेक्षित शंभर टक्के साठा यंदाही होऊ शकला नाही. उशिरा गेट बंद केल्यामुळे हतनूरमधून सोडलेले बरेच पाणी वाहून गेले.. त्यामुळे शेळगावमधील पाणीसाठ्याची मजल यावर्षी जेमतेम ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली. जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांच्या एकत्रित पाणीसाठ्याचा विचार करता गत वर्षाच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमध्ये ५ टक्के कमी साठा असून तो ऑगस्ट २०२७ पर्यंत टिकवायचा आहे.
यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे जिल्ह्यात सुमारे २० ते २५ टक्के कमी पाऊस झाला. राज्यात दुष्काळ जाहीर करताना जळगाव जिल्ह्यातील सर्वच १५ तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आलेत. आणि त्यादृष्टीने उपाययोजनाही सुरू झाल्या आहेत.
समाधानकारक साठा
‘एल निनो’चा फटका शेतीला सर्वाधिक बसला. खरीप हंगाम हातचा गेला. त्यातही दिलासादायक बाब अशी की, जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मात्र समाधानकारक साठा आहे. तिकडे नाशिक जिल्ह्यातील पावसाने गिरणा धरण पूर्ण भरले आहे. तापी- पूर्णाच्या प्रवाहाने हतनूर दरवर्षीच ‘ओव्हरफ्लो’ होते. मात्र, या धरणातील ६० टक्के गाळ प्रकल्पाच्या संकल्पित साठ्यावर परिणाम करतो. जळगाव शहरासह जामनेर तालुक्यातील गावांची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणातील साठाही ७० टक्क्यांपर्यंत आहे. अन्य प्रकल्पांमधील साठाही समाधानकारक आहे. मात्र, गत वर्षाच्या तुलनेत यंदा एकत्रित प्रकल्पांमधील साठा ५ टक्क्यांनी कमीच आहे.
शेळगाव भरलेच नाही
दरवर्षाप्रमाणे यंदाही हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. मात्र, पाटबंधारे विभागाचे नियोजन चुकले व वेळीच शेळगाव बॅरेजचे गेट पूर्णपणे बंद न केल्याने तापीतून बरेच पाणी वाहून गेले. अर्थात, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेळगावमध्ये पाण्याची आवक सुरू होती, त्या अंदाजावर ते पूर्ण भरेल असा पाटबंधारे विभागाचा कयास होता. मात्र, आजअखेर शेळगाव बॅरेजची पाती १७७.५०० अशी असून त्यात ७९.९१ टक्के साठाच होऊ शकला आहे. आणि आता तर पावसाची शक्यता संपल्यामुळे व वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा कमी होऊ लागेल.
--------
जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती
प्रकल्प---- साठा (दलघमी)--- टक्केवारी--- गतवर्षाची टक्केवारी
हतनूर--------२५५----------१००-------१००
गिरणा-------५१२.८---------९७.९६-----१००
वाघूर--------१७१.९---------६९---------१००
अभोरा-------६.०२------------१००------१००
मंगरुळ-------६.४------------१००--------१००
सुकी---------३९.८-----------१००--------१००
मोर----------७.५३------------९४.१९-----१००
अग्नावती------२.५४-----------९२.२६------१००
हिवरा---------८.८७-----------९२.४६------१००
बहुळा---------१४.१२----------८६.५०------१००
तोंडापूर--------२.७९-----------६०.२५------१००
अंजनी----------१३.८---------८८.८-------१००
गुळ-----------१७.५३----------७७.०२-----८४.८५
भोकरबारी------३.४७-----------५३.१३-----१००
बोरी-----------२३.९----------९५.२-------१००
मन्याड----------१८.४२--------४५.७४-----१००
शेळगाव--------८८.१६---------७९.९१-----६२.९
एकूण सरासरी-----८.९५--------८०.६-------८५.९०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.