Mountain rescued by Students & Forest Department esakal
नाशिक

शेंड्या डोंगराची आग नियंत्रणात; विद्यार्थ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

योगेश सोनवणे

पिंपळगाव (वा.) (जि. नाशिक) : डोंगर परिसरात फेरफटका मारणाऱ्या शाळकरी मुलांनी डोंगराला लागलेली आग (Fire on Mountain) विझविण्यासाठी शिताफीने प्रयत्न करत पर्यावरण रक्षणाचा संदेश कृतीतून दाखवून दिला. ठिकठिकाणच्या डोंगर- दऱ्यांना निसर्गाने सौंदर्याचा खजिना बहाल केला आहे. पावसाळा (Monsoon) व हिवाळ्यात (Winter) नजरेत भरणारे नैसर्गिक सौंदर्य सध्या डोंगरांना लावल्या जाणाऱ्या आगींमुळे उन्हाळ्यात काळवंडून गेले आहे. डोंगर संपत्तीची ही आपली संपत्ती समजून लागलेली आग विझवली पाहिजे. (shendya Mountain caught fire rescued by students Forest Department Nashik News)

गेल्या काही दिवसांपूर्वी भावडे परिसरातील डोंगराला आग लागली. ही आग विझविण्यासाठी शाळकरी मुले वनविभाग कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावले अन्‌ आग आटोक्यात आली. देवळा तालुक्यातील भावडे परिसरातील शेंड्या डोंगराला शनिवारी (ता. २१) दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. वनविभागाचे वनरक्षक जी जी पवार यांनी तालुका वनविभागीय कार्यालयास याबाबत दूरध्वनीद्वारे माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी के. पी. ढुमसे यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्‍यांना घटनास्थळी आग विझविण्यासाठी पाठवले. वनविभाग कर्मचाऱ्‍यांना आग विझवताना पाहून भावडे परिसरातील शाळकरी मुलांना आगीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ जाऊन ती आग विझविण्यासाठी आपले योगदान देत निसर्ग संरक्षणाचे कर्तव्य बजावले.

सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्यामुळे खेड्यातील शाळकरी मुले रानावनात डोंगर परिसरात फेरफटका मारताना दिसतात. शेंड्या डोंगर परिसरात फेरफटका मारणाऱ्‍या शाळकरी मुलांना डोंगरावर आग लागल्याचे दिसून आले. त्यात प्रकाश पवार (पाचवी), ओम माळी (सहावी), करण बर्डे (सातवी), दुर्गेश माळी (चौथी) या शाळकरी मुलांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली. झाड्यांच्या फांद्या तोडून, मित्रांच्या मदतीने त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. पेटलेले गवत विझविले. शेंड्या डोंगर परिसरात दोन्ही बाजूंनी डोंगर परिसर आहे. त्यामुळे झाडीही मोठ्या प्रमाणात असून, डोंगरावर गवत वाळले होते. वाऱ्यामुळे आग भडकत होती. वनविभागाने बराच वेळ प्रयत्न करून रात्री दहाच्या सुमारास आग आटोक्यात आणली. थोडेस दुर्लक्ष झाले असते, मोठ्या प्रमाणात आग पसरली असती. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी के. पी. ढुमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय पगार, जी. जी. पवार व ग्रामस्थांसह त्या शाळकरी मुलांनी आग आटोक्यात आणली.

"डोंगर परिसरात आग लागली तर नुसते वनविभागानेच आग विझविली पाहिजे असे नाही तर निसर्ग संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. भावडे परिसरात आग लागल्यावर ती आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थ धजावलेच परंतु; विशेष कामगिरी केली त्या लहानग्या शाळकरी मुलांनी. त्याचे विशेष कौतूक वाटते."

- के. पी. ढुमसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, देवळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT