नाशिक

वीज तपासणी पथकावर ग्रामस्थांचा रोष

CD
(पान ४ ला मेन) ------------ SKR26B02719 शेणपूर : वीज कर्मचाऱ्यांना जाब विचारताना ग्रामस्थ. ----------- वीज तपासणी पथकावर ग्रामस्थांचा रोष शेणपूरला वीजचोरी तपासणीसाठी आलेल्या पथकाला घेराव सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १३ : शेणपूर (ता. साक्री) येथे अनधिकृत वीज जोडण्या, वीजचोरी आणि विजेच्या गैरवापराची तपासणी करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या पथकाला ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. साधारणतः दहा कर्मचाऱ्यांच्या या पथकाला ग्रामस्थांनी घेराव घालत गावातील प्रलंबित वीज समस्यांचा जाब विचारला. ग्रामस्थांचा वाढता रोष लक्षात घेऊन अखेर पथकाला माघारी परतावे लागले. ------ गावात लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, तिरपे झालेले खांब, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा, वारंवार वीज खंडित होणे आणि नादुरुस्त रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी सोसावा लागणारा आर्थिक भार यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत. रोहित्रावरील फ्युज किंवा डीओ टाकण्यासाठी ग्रामस्थांनाच जीव धोक्यात घालावा लागत असल्याचा आरोपही करण्यात आला. या समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही वीज प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये आधीपासूनच नाराजी होती. अशा परिस्थितीत समस्यांचे निराकरण करण्याऐवजी थेट अनधिकृत वीज जोडण्या व वीजचोरीच्या तपासणीसाठी पथक गावात दाखल झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. आधी गावातील वीजविषयक अडचणी सोडवा, त्यानंतर कारवाई करा, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. या आंदोलनात महिला ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाल्यास त्यांच्यावरील आर्थिक भार आणखी वाढेल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. वीजपुरवठ्याशी संबंधित मूलभूत समस्या सोडवून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. ------- वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर यंदा पावसाळ्यात तसेच परतीच्या पावसानेही अपेक्षित साथ न दिल्याने शेतातील पिके हातातून निसटली आहेत. विहिरीतील पाण्याच्या साहाय्याने पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असताना वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा त्यांच्या अडचणींत भर घालत आहे. इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली तासनतास वीजपुरवठा बंद ठेवणे आणि कृषिपंपांसाठी रात्री- अपरात्री वीज उपलब्ध होणे, यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर वीज कंपनीच्या पथकाने अचानक तपासणी मोहिम राबविल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. घेरावादरम्यान कर्मचाऱ्यांनी मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रण केले. या व्हिडिओच्या आधारे ग्रामस्थांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला. स्मार्ट मीटर बसविण्यासाठी दबावतंत्राचा आरोप ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्याबाबत विरोध होत असताना तपासणीच्या नावाखाली धाडसत्र राबवून ग्राहकांमध्ये भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. गावात वीजबिलांची शंभर टक्के वसुली होत असल्याचा दावा करताना अशा परिस्थितीत अचानक तपासणी मोहीम राबविण्याचे कारण काय, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला. ------- गावात लोंबकळणाऱ्या तारा, तिरपे झालेले खांब, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्या आहेत. फ्युज व डीओसंबंधी अडचणी सोडविण्यासाठी वायरमन गावात उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, तो मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो. रोहित्रावरील फ्युज किंवा डीओ टाकताना ग्रामस्थांना जीव धोक्यात घालावा लागतो. या समस्यांचे प्रथम निराकरण करणे गरजेचे असताना ग्रामस्थांवरच तपासणीसाठी धाड टाकणे योग्य नाही. - आकाश काकुस्ते, सरपंच प्रतिनिधी, शेणपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR मोहिमेत धक्कादायक प्रकार उघड, नवी मुंबई महानगरपालिकेच्या पत्त्यावर २७ मतदारांची नोंद

Ranji Trophy 2026-27 : गड आला, पण...! मुंबईने डावाने विजयासह बोनस गुण कमावला, मात्र आयुष म्हात्रे ६ आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला; नेमकं काय घडलं?

४८० सुपर मार्केटमध्ये सायबर हल्ला, फ्रीज आणि फ्रिजरचं तापमान ५० अंशावर, अनेक ठिकाणी लागली आग

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर हत्या प्रकरणी माजी महापौरांच्या पतीची चौकशी सुरू

गिरणी कामगारांच्या घरांची प्रतीक्षा संपली! घरे उभारण्यासाठी साडेचार हेक्टर जागा, जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच जागेबाबत पत्र मिळणार

SCROLL FOR NEXT