(ही बातमी सिंगल कॉलम वापरावी)
शिल्प व खानदेश प्लॅटिनम
हॉस्पिटलचे आज उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : जळगावात नव्याने सुरू झालेल्या शिल्प हॉस्पिटल व खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या दोन्ही रुग्णालयांचा संयुक्त शुभारंभ सोहळा उद्या (ता. १७) होत आहे. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सायंकाळी पाचला हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती डॉ. श्रीराज महाजन यांनी दिली. यावेळी ॲड. यशवंत महाजन उपस्थित होते. डॉ. महाजन यांनी सांगितले, की शिल्प हॉस्पिटल येथे प्लास्टिक सर्जरी विभागांतर्गत ट्रॉमा सेंटर, रक्तवाहिनी तुटणे, जन्मजात व्यंग, जखमा व कॅन्सर, हेअर ट्रान्सप्लांट, कॉस्मेटिक सर्जरी, स्तनांच्या कॉस्मेटिक सर्जरी, नाक सुबक करण्याच्या शस्त्रक्रिया, शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करणे, जुन्या जखमांचे व भाजल्यानंतरचे व्रण कमी करणे तसेच पायांच्या फुगलेल्या नसांवरील उपचार या सुविधा प्लास्टिक सर्जरी विभागात उपलब्ध असतील. तसेच खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ट्रॉमा, क्रिटिकल केअर, कार्डियाक केअर, विविध सुपरस्पेशालिटी विभाग उपलब्ध आहेत. या विभागांमध्ये अत्याधुनिक आयसीयू विभाग, ट्रॉमा व ॲक्सिडेंट उपचार विभाग, शस्त्रक्रिया विभाग, प्लास्टिक सर्जरी विभाग आणि अस्थिरोग विभाग यांचा समावेश असून सर्व सुपरस्पेशालिटी सर्जरी उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.