Shinde government ward structure Local elections postponed again Supreme Court hearing in January nashik politics esakal
नाशिक

‘स्थानिक’च्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयात जानेवारीत सुनावणी

मार्च २०२२ मध्ये नाशिकसह राज्यातील १० महापालिकांची मुदत संपुष्टात आली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिंदे सरकारने नव्याने प्रभागरचना बदलण्याचे दिलेले आदेश व नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या निवडणुकांवर दाखल करण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवर आज झालेल्या सुनावणीत १७ जानेवारी २०२३ ची तारीख दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मार्च २०२२ मध्ये नाशिकसह राज्यातील १० महापालिकांची मुदत संपुष्टात आली. त्यापूर्वी आठ महापालिकांच्या निवडणुकीची प्रतिक्षा होती. परंतु, ओबीसी आरक्षणाबाबत असलेल्या दाव्यामुळे निवडणुका घेतल्या जात नव्हता. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात आले.

त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रभागरचना रद्द करून त्याऐवजी तीन सदस्यांचा प्रभागरचना नव्याने तयार करण्याच्या सूचना दिल्या. या विरोधात पुण्यातून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयाने निकाल दिल्यानंतर यापूर्वी नगरपालिकांच्या ओबीसी आरक्षणाविना पार पडलेल्या निवडणुकांचा मुद्दा घेऊन ती याचिकादेखील न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकांवर गेल्या दोन महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत नव्याने १७ जानेवारी २०२३ ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT