Shinde Group giving letter to nmc divisional commissioner
Shinde Group giving letter to nmc divisional commissioner esakal
नाशिक

CM Shinde Group: खड्डेमय रस्त्यावरून शिंदे गट आक्रमक! विभागीय आयुक्तांना एमएनजीएल विरोधात निवेदन

सकाळ वृत्तसेवा

CM Shinde Group : शहरात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून विविध ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहे.

रस्ते खोदताना महापालिकेशी केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग झाला असून, तत्काळ एमएनजीएलच्या ठेकेदारांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विभागीय आयुक्त तथा महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली केली. (Shinde group aggressive from potholed road Representation against MNGL to Divisional Commissioner nashik news)

रस्ता खोदण्यापुर्वी ‘जीपीआरएस’ द्वारे लोकेशन निश्चित करणे, रस्त्याखाली सर्व सेवा वाहिन्यांचा विचार करून खोदाईचा मार्ग निश्चित करून महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांना दाखविणे, खोदकाम करताना प्रथम रस्त्याचा पृष्ठभाग डायमंड कटरने कापून खोदाई करणे, अस्तित्वातील डांबरी, काँक्रिट व खडीकरण केलेले रस्त्यापासून जास्तीत जास्त अंतर सोडून काम करणे या अटी व शर्ती आहेत.

परंतु, एमएनजीएल ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध रस्ते खोदले. शिवाय रस्ते खोदताना वीज वितरण कंपनीच्या केबल, पाणी तसेच ड्रेनेजलाइन मोठ्या प्रमाणात तुटल्या आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

रस्ता पूर्ववत केल्यानंतर कामाचे अनावश्यक मटेरिअल रस्त्यावरच पडून आले आहे. खोदाई केलेल्या रस्त्याचे पुनर्भरण करताना ते व्यवस्थितरीत्या पाणी मारून रोडरोलरच्या साहाय्याने दाबून सुस्थितीत करणे आवश्यक होते.

परंतु त्या पद्धतीने काम झालेले नाही. खोदकामाच्या ठिकाणी बेरिकेडस, वॉर्निंग टेप, रेडियम रिफ्लेक्टर नसल्याने वाहनधारकांना त्रास होतो. चेंबरमध्ये खोदाईची माती जाऊन चोकअप झाल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रस्त्याची खोदाई करताना निघालेले प्लेव्हर ब्लॉक परत लावलेले नाहीत. डांबरी रस्ता खोदताना ब्रोकरचा वापर होत नाही. सरसकट जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या पृष्ठभागाची खोदाई होत केली जात आहे.

महापालिका अधिकाऱ्यांसमोर अटी शर्तीचा भंग होत असताना एमएनजीएल कंपनीवर कारवाई होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वेळी उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, उपजिल्हाप्रमुख दिगंबर मोगरे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर, माजी नगरसेवक रमेश धोंगडे, माजी नगरसेविका जयश्री खर्जुल, मेघा साळवे, वैशाली दाणी, सचिन भोसले, नितीन साळवे, विक्रम कदम आदी उपस्थित होते.

"महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने खोदाई करताना अटी व शर्तीचा भंग केला आहे. सर्वसामान्य नागरिकाने जर रस्ता फोडला तर त्यावर फौजदारी गुन्हे दाखल केली जातात. त्याच पार्श्वभूमीवर एमएनजीएल कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा."

- अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT