नाशिक

सुरगाणा स्कूल यश

CD
पान दोन --------------------- शिंदेदिगरच्या एकलव्य स्कूलचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश हॅन्डबॉलमध्ये सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक; विविध क्रीडाप्रकारांत ५ पदकांची कमाई सकाळ वृत्तसेवा पळसन, ता. ३: जनजातीय कार्य मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत शिंदेदिगर (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या क्रीडा महोत्सवात शाळेच्या संघाने एकूण पाच पदकांची लयलूट करत राज्यभरात आपल्या उत्कृष्ट क्रीडागुणांचा ठसा उमटवला आहे. विशेषतः, मुला-मुलींच्या हॅन्डबॉल संघांनी सलग तिसऱ्यावर्षी सुवर्णपदक पटकावत हॅट्ट्रिक नोंदवली. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंसाठी अटीतटीच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या हॅन्डबॉल स्पर्धा गोंदिया जिल्ह्यातील बोरगाव बाजार येथे पार पडल्या. तर मुलींच्या स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, शेंदेगाव येथे झाल्या. या दोन्ही ठिकाणी सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगरच्या खेळाडूंनी कमालीची जिद्द, उच्च दर्जाचे कौशल्य आणि शिस्तबद्ध संघभावनेचे प्रदर्शन करत मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले. दोन्ही हॅन्डबॉल संघांना क्रीडा शिक्षिका हेमा गौर यांच्या मार्गदर्शनासह आयुष दीक्षित यांनी मार्गदर्शन केले. खेळाडूंच्या यशाबद्दल आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, उपआयुक्त विनिता सोनवणे, प्राचार्य श्री. सुरेश नि. देवरे यांनी अभिनंदन केले. --------------- शाळेने मिळविलेले पदक हॅन्डबॉल (मुले गट) : सुवर्णपदक (सलग तिसरे वर्ष) हॅन्डबॉल (मुली गट) : सुवर्णपदक (सलग तिसरे वर्ष) ४०० मीटर धावणे (मुले गट) : रौप्यपदक १५०० मीटर धावणे (मुले गट) : कांस्यपदक थाळीफेक (मुली गट) : कांस्यपदक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! कोंढवा, आळंदीतून १ हजार ४९१ किलो मिठाई जप्त करून नष्ट

Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरची क्रेझ! महागड्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही 'रिग्रेट', प्रतीक्षा यादी शंभरीपार

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

SCROLL FOR NEXT