नाशिक

४६ वर्षांनंतर पुन्हा जुळल्या मैत्रीच्या आठवणींच्या तार

CD
(पान ४ ला ॲंकर) SKD26B04326 शिंदखेडा : ४६ वर्षांनंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी. ----------- चाळीस वर्षांनंतर पुन्हा जुळची मैत्रीची तार शिंदखेड्यात बारावी वाणिज्य वर्गाचा स्नेहमिलन सोहळा सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. ५ : तब्बल ४६ वर्षांपूर्वी बारावी वाणिज्य वर्गात एकत्र शिक्षण घेतलेल्या मित्र-मैत्रिणींची पुन्हा एकदा भेट झाली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मनमिरा लॉन्स व मंगल कार्यालयात आयोजित तीन दिवसीय स्नेहमिलन सोहळ्यात पुणे, मुंबई, ठाणे, गोवा, बडोदा, नाशिक आदी शहरांत वास्तव्यास असलेले ४० माजी विद्यार्थी सहभागी झाले. कुटुंबीयांसह सुमारे ७० जणांनी या आनंदसोहळ्याचा अनुभव घेतला. ------ २ ऑक्टोबरला शिंदखेड्यात आगमन झाल्यानंतर मित्रांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी पाटण येथील आशापुरी देवीचे दर्शन घेतले. यानंतर तब्बल ४६ वर्षांपूर्वी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले त्या महाविद्यालयाला भेट दिली. जुन्या वर्गखोलीत प्रवेश करताच अनेकांच्या डोळ्यांसमोर विद्यार्थी जीवनातील आठवणींचा पट उलगडला. ज्या बाकांवर बसून शिक्षण घेतले त्याच ठिकाणी पुन्हा बसण्याचा अनुभव भावनिक ठरला. मित्रांनी प्रा. सतीश पाटील यांना ‘सर, तुम्ही आमचा तास घ्या,’ अशी विनंती केली. त्यावर त्यांनी अंधश्रद्धेचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. रात्री जुन्या आठवणी, कॉलेजमधील गंमती-जमती आणि आयुष्यातील सुख-दुःखांच्या आठवणींनी गप्पांची मैफल रंगली. ३ ऑक्टोबरला माजी गुरुजनांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रा. ए. बी. कुलकर्णी, प्रा. श्रीमती एस. बी. पवार, प्रा. ए. एस. जोशी व प्रा. सी. जे. सोनार यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी किशोर देशमुख होते. सहभागी सर्व मित्र- मैत्रिणींचाही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. रात्री अतुल निकम व जाधव यांच्या गाण्यांच्या मैफिलीने कार्यक्रमाला रंगत आणली. जुन्या हिंदी-मराठी गाण्यांवर उपस्थितांनी मनमुराद आनंद घेतला. मनोहर पाटील यांनी नृत्य सादर केले. साठी ओलांडलेल्या मित्र- मैत्रिणींनीही ‘झिंगाट’वर मनसोक्त नृत्य केले, तर विद्यार्थीनींनी गरबा सादर केला. ४ ऑक्टोबरला निरोपाच्या वेळी वातावरण भावूक झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ४६ वर्षांचा काळ हरवला; मात्र मैत्रीची नाळ तशीच घट्ट राहिली, याचा प्रत्यय या स्नेहमिलनातून आला. या कार्यक्रमासाठी सुनीता सोनगडकर, मनोहर पाटील, प्रा. सतीश पाटील, अनिल कासार, नितीन विसपुते व प्रमोद जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रमोद जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Vastu Tips: राजकारण आणि सरकारी नोकरीत यश मिळवून देतील घरातील 'या' २ दिशा; पण 'ही' एक चूक कधीही करू नका!

ती गोष्ट घडली अन् अजय देवगनने धरला तब्बल २० वर्षाचा अबोला; कोण आहे तो व्यक्ती आणि असं काय घडलं?

IND A vs AUS A: एका कॅचसाठी भारताच्या दोन खेळाडूंची टक्कर... पुढे जे घडले त्यावर कुणालाच विश्वास बसला नाही, Video Viral

'आता दे ग दे जुजबी गालावर' सोनाली बेंद्रे आणि सई ताम्हणकरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाली... Video Viral

SCROLL FOR NEXT