नाशिक

शिंदखेडा शिवारात पीक नुकसानीच्या पंचनामे सुरुवात

CD
(पान ३ ला मेन) SKD26B04323 शिंदखेडा : पिकांचे पंचनामे करताना तलाठी जितेंद्र चव्हाण व परिसरातील शेतकरी. ------- शिंदखेड्यात पिकांचे पंचनामे सुरू तलाठ्याच्या पथकाची प्रत्यक्ष शेतशिवारात पाहणी सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. ४ : पावसाने दिलेली मोठी उघडीप, प्रतिकूल हवामान आणि पाण्याअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शिवारात रविवारी (ता. ४) पीक नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या आदेशानुसार तलाठी जितेंद्र चव्हाण यांनी आपल्या पथकासह शेतशिवारात प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांची माहिती घेतली. कापूस, मका तसेच इतर खरीप पिकांवर पावसाच्या उघडीपीचा आणि पाण्याच्या कमतरतेचा मोठा परिणाम झाला आहे. पंचनाम्यादरम्यान तलाठी व त्यांच्या पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यात आली. प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा अचूक आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा. तसेच, पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शासनाने शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. या वेळी सुनील चौधरी, दरबार गिरासे, नारायण मराठे, दत्तात्रय देसले, अविनाश देसले, श्यामकांत पवार चौधरी, राजेंद्र चौधरी, भूषण मराठे, देवराम चौधरी, गोरख देसले, दिगंबर मधुकर पाटील, राजेंद्र तुकाराम चौधरी, बाबा पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शिंदखेडा शिवारात सुरू झालेल्या या पंचनाम्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. आता पंचनामे किती जलद आणि पारदर्शकपणे पूर्ण होतात, शासनाकडून किती मदत मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. --------- पंचनाम्याच्या प्रक्रियेसाठी आधार कार्ड, फार्मर आयडी, बँकेचे पासबुक तसेच सामूहिक क्षेत्र असल्यास संमतीपत्राच्या छायांकित प्रती तलाठी कार्यालयात जमा कराव्यात. - जितेंद्र चव्हाण, तलाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT