(पान ४ ला मेन)
SKD26B04356
शिंदखेडा : सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करताना नगराध्यक्षा कलावती माळी, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर व नगरसेवक.
---------
व्यापारी संकुलाची भाडेवाढ नामंजूर
दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपंचायतीचा सर्वसाधारण सभेत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. १५ : शहरातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन व्यापारी संकुलाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव शिंदखेडा नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आला. यापूर्वी मंजूर केलेली भाडेवाढही १ एप्रिल २०२७ पासून लागू करावी, असे सूचित करण्यात आले. दरम्यान, नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी पंचायत समितीच्या आवारातील गट क्रमांक ४३९ मधील जागा मिळावी, यासह विविध विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.
-----------
शिंदखेडा नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपनगराध्यक्ष उदय देसले, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, अभियंता विपुल साळुंखे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. सभेत शिरपूर रोडवरील जुन्या आमदार निवासाच्या जागेवर नवीन व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. शहरातील २१३ पेक्षा अधिक पथविक्रेत्यांना ओळख निर्माण करून देणे, बचत गटातील महिलांसाठी अमृत योजनेची अंमलबजावणी आदी विषयांवरही चर्चा झाली.
शहरातील मैला उपशासाठी डिस्लजिंग व्हेईकलद्वारे आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही निर्णय घेण्यात आला. पाच किलोमीटर अंतरापर्यंत मैला उपशासाठी दोन हजार ५०० रुपये दर असून, त्यापुढील प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी ३० रुपये आकारण्यास मंजुरी देण्यात आली. नगरपंचायतीतील ११ सफाई कामगार आणि २१ कार्यालयीन कर्मचारी अशा एकूण ३२ कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार किमान वेतन देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, मंगल कार्यालये आणि खासगी समारंभांसाठी घंटागाडीची मागणी केल्यास संबंधितांकडून ३०० रुपये शुल्क आकारण्यास मंजुरी देण्यात आली.
सभेला गटनेत्या तथा नगरसेविका वंदना परमार, रज्जुबाई माळी, पूनम मराठे, सुनीता देसले, सुयोग भदाणे, अर्जुन भिल, ज्ञानेश्वर संकट, अनिल वानखेडे, आराफेबी कुरेशी, शितल सोनवणे, कमलबाई पाटोळे, अश्विनी राजपूत, संगीता भिल उपस्थित होत्या. बांधकाम सभापती मनोहर पाटील, पुष्पलता सोनवणे, दीपक देसले, स्वीकृत नगरसेवक दीपक माळी अनुपस्थित होते. विवेक डांगरीकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
---------
प्रभागांतील समस्यांवरून
नगरसेवक आक्रमक
आयत्यावेळी मांडलेल्या विषयांमध्ये दलित वस्ती सुधारणा निधीच्या वाटपातील तफावत दूर करणे, प्रभाग क्रमांक १७ मधील लोंबकळणाऱ्या वीजतारा दुरुस्त करणे, स्वागत कमान उभारणे आणि बी. के. देसले नगरमधील प्रलंबित गटारीचे बांधकाम पूर्ण करणे, अशा मागण्या करण्यात आल्या. शहरातील कोणत्या भागात कोणते सफाई कामगार नियुक्त करण्यात आले आहेत, याची माहिती संबंधित प्रभागातील नगरसेवकांना द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.