नाशिक

शिंदखेडा महाविद्यालयातील विद्यार्थी नोकरी साठी रवाना

CD
SKD26B04338 शिंदखेडा : पुणे येथे नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, भूषण वानखेडे, चिवीत जगदेव, रमेश भामरे. ------------- शिंदखेड्यातील विद्यार्थी नोकरीसाठी पुण्याला रवाना शिंदखेडा, ता. ८ : येथील श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कै. शं. दे. पाटील उर्फ बाबूराव दादा साहित्य, वाणिज्य आणि कै. भाऊसाहेब म. दि. सिसोदे विज्ञान महाविद्यालय, आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. परिसरातील युवक- युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या. मेळाव्याला ३५९ विद्यार्थी उपस्थित होते. यात निवड झालेले विद्यार्थी नोकरीसाठी पुण्याला रवाना झाले. या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल १५६ विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त झाली. त्यात बी. कॉम आणि बी. एस्सी या शाखेतील दहा विद्यार्थ्यांची पहिली टीम पुणे येथील टाटा गोशन या नामांकित कंपनीत डाटा ऑपरेटर या पदासाठी निवड झाली. त्यांना दरमहा १९००० पेक्षा अधिक वेतन मिळणार आहे. त्यात महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांचीही समावेश आहे. त्यांना दरमहा २२,५०९ पेक्षा अधिक वेतन मिळणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कंपनीच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रफुलकुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, संचालक सुरेश देसले, प्राचार्य डॉ. आशुतोष पाटील, उपप्राचार्य डॉ. संजय बोरसे, उपप्राचार्य डॉ. विशाल पवार, प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, उपप्राचार्य सुवर्णसिंह राऊळ, कार्यालयीन अधीक्षक राहुल पाटील, आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रमचे प्रमुख भूषण वानखेडे, चिवीत जगदेव यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Ladki Bahin Yojana Installment Update : लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; 'या' महिलांनाच मिळणार 1500 रुपये? योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर लगेच करा 'हे' काम

Latest Marathi News Live Update : सैपन बेगडे यांच्यासह चार जणांचा 'आदर्श पोलीस पाटील' म्हणून गौरव

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

SCROLL FOR NEXT