नाशिक

पाणी नासाडी करणाऱ्या पाच नागरिकांचे नळ कनेक्शन खंडित

CD
SKD26B04386 शिंदखेडा : पाण्याची नासाडी करणाऱ्यांचे नळ कनेक्शन कट करताना पाणीपुरवठा कर्मचारी. ------- पाण्याची नासाडी करणाऱ्यांना दणका शिंदखेडा नगरपंचायतीने पाच नागरिकांचे नळ कनेक्शन तोडले सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. २८ : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याची नासाडी रोखण्यासाठी शिंदखेडा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील चिराग गल्ली आणि तेरा घर मोहोल्ला परिसरात पाण्याची नासाडी करणाऱ्या पाच नागरिकांचे नळ कनेक्शन तोडले. पाणीपुरवठा विभागप्रमुख विपुल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या वेळी व्हॉल्व्हमन पंडित माळी, संभाजी कोळी, नरेंद्र बडगुजर आणि फिरोज तेली यांनी सहभाग घेतला. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याने नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळावी, नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये. तसेच, पाण्याची गळती आढळल्यास तातडीने नगरपंचायत प्रशासनाला कळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनीही नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. पाणी ही अत्यावश्यक नैसर्गिक संपत्ती असून, दुष्काळाच्या काळात त्याचा जबाबदारीने वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पाण्याची नासाडी रोखण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व्यवस्थेचा योग्य वापर करणे आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे संवर्धन करणे आवश्यक असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध नगरपंचायत प्रशासनाकडून यापुढेही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News : पालघरमध्ये प्रकल्पविरोधी संघर्ष पेटणार! ५२ संघटनांचा प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार, ३० ऑक्टोबरला जनआक्रोश सभा

Satana News : वृक्षतोड रोखा, अन्यथा जनआंदोलन; बागलाणमध्ये राष्ट्रवादीसह पर्यावरणप्रेमींचा एल्गार! माजी आमदार संजय चव्हाण यांचा इशारा

Marathi News Live Updates : पुण्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात मोठी कारवाई; १३ पोलिसांसह २५ जण अटकेत!

संकट येण्याआधी मिळतात संकेत? घरातील 5 गोष्टींबाबत काय सांगते चाणक्य नीती?

Smile Day: एका स्मितहास्यामुळे बदलू शकते का संपूर्ण नाते? जाणून घ्या मानवी जीवनातील 'स्मितहास्याची' जादू!

SCROLL FOR NEXT