नाशिक

शिरपूर : कुस्ती स्पर्धेत विद्यार्थिनींचे यश

CD
SHC26B13461 शिरपूर : विजेत्या कुस्तीपटू विद्यार्थिनींचे कौतुक करताना सचिव निशांत रंधे, प्राचार्या सारिका रंधे. ---------- रंधे विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुस्ती स्पर्धेत चमकल्या शिरपूर, ता. ७ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व जिल्हा क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय नाशिक विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील रंधे कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळविले. इयत्ता नववीतील गौरी महेंद्र कोळी हिने १४ वर्षांखालील ३६ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे तिची खोपोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गौरी कोळी हिने विभागीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत आपल्या गटात अव्वल स्थान मिळविले. याच स्पर्धेत विद्यालयाची खेळाडू श्रुती महेंद्र कोळी हिनेही उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, कोशाध्यक्षा आशाताई रंधे, नगरसेवक रोहित रंधे, राहुल रंधे, शशांक रंधे, व्यवस्थापक बापू कापडे व विश्वस्त मंडळाने कौतुक केले. मुख्याध्यापिका सारिका रंधे, उपमुख्याध्यापक एस. डी. न्हासदे, पर्यवेक्षिका उषा पाटील, क्रीडाशिक्षक एम. टी. चित्ते, पालक डॉ. महेंद्र कोळी आदींनी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचे आंदोलन तीव्र; राहुल गांधींसह नेते रस्त्यावर

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT