व्यावसायिक तरुणाची
शिरसोलीत आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : शिरसोली प्र. बो. येथे राहत्या घरात ४२ वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. १६) सकाळी उघडकीस आली. अनिल नामदेव फुसे असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अनिल फुसे हे शिरसोली येथे कापड विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ते पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह राहत होते. शुक्रवारी सकाळी कुटुंबीयांना घरातील पुढील खोलीत ते बेशुद्धावस्थेत आढळले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच शिरसोलीचे पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी भेट देऊन एमआयडीसी पोलिसांना कळविले. त्यानंतर अनिल फुसे यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अनिल फुसे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी आणि चार भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार हरपल्याने फुसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.