नाशिक

धुळे शिवभोजन थाळी

CD
धुळे ः टुडे १ साठी, मेन --- शिवभोजन थाळीला नव्या नियमांची चौकट शहरी थाळी ५०, ग्रामीण ३५ रुपये; गरजू ग्राहकांचा हिस्सा दहा रुपयेच सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ ः गरीब, मजूर, गरजू, तसेच स्थलांतरित नागरिकांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करून देणाऱ्या शिवभोजन योजनेच्या नियमांत बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार शहरी भागातील एका थाळीचे मूल्य ५० रुपये, तर ग्रामीण भागातील थाळीचे मूल्य ३५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र, ग्राहकाकडून पूर्वीप्रमाणेच केवळ दहा रुपये आकारले जाणार आहेत. उर्वरित रक्कम शासन अनुदानातून केंद्रचालकाला मिळणार आहे. धुळे जिल्ह्यात ४८, तर नंदुरबार जिल्ह्यात ३५, अशी एकूण ८३ शिवभोजन केंद्रे नोंदणीकृत आहेत. प्रत्येक शिवभोजन केंद्रावर दररोज किमान ७५ आणि कमाल २०० थाळ्या उपलब्ध ठेवणे बंधनकारक राहणार आहेत. एका वेळी किमान २५ व्यक्ती बसून भोजन करू शकतील एवढी आसनव्यवस्था केंद्रात असणे आवश्यक आहे. त्यामुळे एका केंद्रातून दिवसाला जास्तीत जास्त २०० नागरिकांना भोजन घेता येईल. शिवभोजन थाळीत दोन चपाती, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम वरण आणि १५० ग्रॅम भात देणे अपेक्षित आहे. शहरी भागात थाळीचे मूल्य ५० रुपये असून, त्यापैकी दहा रुपये ग्राहकाकडून, तर ४० रुपये शासन अनुदानातून मिळतील. ग्रामीण भागात थाळीचे मूल्य ३५ रुपये असून, ग्राहकाचा हिस्सा १० रुपये आणि शासनाचे अनुदान २५ रुपये राहणार आहे. जिल्ह्यात ४८ केंद्रे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या नोंदीनुसार धुळे जिल्ह्यात ४८ शिवभोजन केंद्रे आहेत. धुळे शहर व तालुक्यात जिल्हा शासकीय रुग्णालय, बसस्थानक, जुने धुळे, देवपूर, तसेच प्रमुख बाजारपेठांच्या परिसरात केंद्रे आहेत. शिरपूर तालुक्यात शिरपूर शहरातील बसस्थानक, तहसील परिसरासह प्रमुख ग्रामीण भागात केंद्रे कार्यरत आहेत. शिंदखेडा तालुक्यात शिंदखेडा, नरडाणा, तसेच दोंडाईचा नगर परिषद क्षेत्रात केंद्रे आहेत. साक्री तालुक्यात साक्री शहरासह पिंपळनेर परिसरात शिवभोजन केंद्रे आहेत. गर्दीच्या ठिकाणी केंद्र गरीब, मजूर आणि कामगारांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी शिवभोजन केंद्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालये, बसस्थानके, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, तसेच शासकीय कार्यालयांच्या परिसराचा त्यात समावेश आहे. धुळे शहरातील देवपूर, जुने धुळे, बसस्थानक व जिल्हा रुग्णालय परिसरापासून शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा, साक्री, पिंपळनेरपर्यंत ही सुविधा गरजू नागरिकांसाठी महत्त्वाची ठरते. वीजपुरवठा खंडित झाल्यास सीसीटीव्ही सुरू राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी, तसेच लाभार्थ्यांना शिळे किंवा खराब अन्न मिळू नये, याची जबाबदारी केंद्रचालकावर राहणार आहे. अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी संबंधित यंत्रणांकडून केली जाणार आहे. --- १४-१ चौकट सीसीटीव्हीमुळे केंद्रांवर देखरेख शिवभोजन केंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी ३, या वेळेत भोजन उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. केंद्रातच बसून भोजन करण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. भोजन बाहेर नेण्यास किंवा बाहेरील अन्न केंद्रात आणण्यास परवानगी राहणार नाही. टेक-अवे किंवा पार्सल सुविधेलाही बंदी आहे. प्रत्येक शिवभोजन केंद्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रातील भोजन व्यवस्था, लाभार्थ्यांची ये-जा, तसेच नियमांचे पालन यावर देखरेख ठेवता येणार आहे. संबंधित आस्थापनेत कार्यरत शासकीय कर्मचारी किंवा कर्मचारीवर्गाला शिवभोजन योजनेतील सवलतीच्या दरात भोजन घेता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT