नाशिक

शिवछत्रपती पुरस्कारांसाठी अर्जाची २५ पर्यंत मुदतवाढ

CD
शिवछत्रपती पुरस्कारांसाठी अर्जाची २५ पर्यंत मुदतवाढ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : शासनाच्या क्रीडा विभागामार्फत २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांसाठी दिल्‍या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान केला जातो. यात क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडामहर्षींसाठी जीवनगौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच खेळाडू, साहसी उपक्रमांमध्ये सहभागी खेळाडू आणि दिव्यांग खेळाडूंसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात. शासन निर्णय २९ डिसेंबर २०२३ व २५ जानेवारी २०२४ नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची सुधारित नियमावली निश्‍चित केली आहे. या नियमावलीनुसार २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांच्या पुरस्कारांसाठी राज्यातील पात्र खेळाडू व संबंधित व्यक्तींकडून १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले होते. मात्र, इच्छुक अर्जदारांना अर्ज सादर करण्यासाठी अधिक वेळ मिळण्यासाठी अतिरिक्‍त मुदतवाढ दिली जात असून, २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. इच्छुक अर्जदारांनी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘ताज्या घडामोडी’ या सदरामधील ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ या पर्यायावर क्लिक करून अर्ज भरण्याबाबतच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gavit Sisters Case : भारतात पहिल्यांदा महिलांना मिळणार होती फाशी; कोल्हापूरच्या गावित बहिणींचं क्रौर्य ऐकून थरकाप उडेल!

Laxman Hake: लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीत; दुष्काळ प्रश्नावर शेतकऱ्यांसह ओबीसी आंदोलकांशी चर्चा

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? एरिअर्स आणि वाढीव पेन्शन मिळणार की नाही?

Latest Marathi News Live Update: साई संस्थानच्या बसला अचानक लागली आग.. प्रवासी भाविक सुखरूप

Air Pollution: प्रदूषणाचा विळखा जीवघेणा! आरोग्य विम्याच्या क्लेममध्ये 3 वर्षांत 4.3 पट वाढ; पुणे देशात दुसरे

SCROLL FOR NEXT