Shiv Chhatrapati sports awards to six athletes from Nashik district news esakal
नाशिक

Shiv Chhatrapati Sports Awards : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारात नाशिकचा ‘षटकार’; राज्य सरकारतर्फे घोषणा

सकाळ वृत्तसेवा

Shiv Chhatrapati Sports Awards : क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली असून, नाशिक जिल्ह्यातील सहा खेळाडूंचा यात समावेश आहे.

सहापैकी चार खेळाडू हे ग्रामीण भागातील, तर दोन शहरातील आहेत. राज्य सरकारने २०१९-२०, २०-२१ व २१-२२ या तीन वर्षांतील पुरस्कार एकत्रितपणे जाहीर केले आहेत. (Shiv Chhatrapati sports awards to six athletes from Nashik district news )

क्रीडा विभागातर्फे दरवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, साहसी पुरस्कार प्रदान केले जातात. यात दिव्यांग खेळाडूंचा समावेश आहे. त्यासाठी क्रीडा विभागाने ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविले होते. यात १९-२० या वर्षासाठी २७५ अर्ज दाखल झाले; तर २०-२१ साठी २८४ अर्ज सादर झाले.

२१-२२ या वर्षासाठी ३३२ अर्ज प्राप्त झाले. गेल्या तीन वर्षांत एकूण ८९१ खेळाडूंनी या पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यापैकी खेळाडूंची निवड समितीने केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात नाशिक जिल्ह्यातील तलवारबाजीचा खेळाडू जय सुरेश शर्मा (२०१९-२०), सागर दत्तात्रय नागरे (कयाकिंग-कनॉईंग २०१९-२०), सर्वेश अनिल कुशारे (अॅथलेटिक्स २०२१-२२), मंजूषा अशोक पगार (बेसबॉल २०२१-२२), नीलेश धनंजय धोंडगे (रोईंग २०२१-२२), मिताली श्रीकांत गायकवाड (आर्चरी २०२२-२१ दिव्यांग) यांना हा पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार निवड समितीत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नामदेव शिरगावकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांचा समावेश होता.

"जिल्ह्यातील सहा खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. यातील चार खेळाडू हे मविप्र समाज शिक्षण संस्थेतील आजी व माजी खेळाडू असल्याचा आनंद वाटतो. तसेच, पिंपळगावसारख्या ग्रामीण भागातील खेळाडूंचा दुसऱ्यांदा गौरव होत असल्याचा अभिमान आहे. यापुढेही असेच खेळाडू तयार होतील, यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत." - हेमंत पाटील, क्रीडा प्रशिक्षक, मविप्र समाज शिक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT