Former corporators and key office bearers entered Matoshree to show loyalty to Shiv Sena and party chief Uddhav Thackeray.
Former corporators and key office bearers entered Matoshree to show loyalty to Shiv Sena and party chief Uddhav Thackeray. esakal
नाशिक

मला ज्यांनी मोठे केले, ते माझ्याबरोबरच : Shiv Sena पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेनेने आतापर्यंत ज्या लोकांना मोठे केले त्यांनी पक्षाशी गद्दारी करत सोडचिठ्ठी दिली. मात्र, ज्या शिवसैनिकांनी मला व शिवसेनेला मोठे केले ते अजूनही माझ्यासोबत आहे. याचा मला अभिमान असून, हीच माझी ताकद आहे व हीच ताकद भविष्यात गद्दारांना नेस्तनाबूत करेल, असे भावनिक उद्गार शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. (Shiv Sena chief Uddhav Thackeray Statement About shiv sainik Nashik Latest Political News)

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीसहून अधिक आमदारांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत स्वतःचा गट स्थापन केला. भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता संघटनात्मक पातळीवर शिवसेनेला नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. नाशिक शहरात एका माजी नगरसेवकाने शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडेल, असे वातावरण निर्माण केले गेले.

त्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक दृष्ट्या शिवसेनेला बळकटे आणण्यासाठी शिवसेनेचे नेते मैदानात उतरले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेची निष्ठा दाखवण्यासाठी शुक्रवारी (ता. २३) मातोश्री निवासस्थानी माजी आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांची भेट घेतली. शिवसेनेचे एकजूट पाहून उद्धव ठाकरे भारावून गेले यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेने ज्या लोकांना मोठे केले त्यांनी स्वार्थासाठी पक्षाशी गद्दारी केली मात्र सर्वसामान्य शिवसैनिक आजही माझ्या सोबत आहे.

जोपर्यंत सर्वसामान्य शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत शिवसेना संपू शकत नाही. सध्या परिस्थिती वाईट आहे तोडफोड करणे हे भारतीय जनता पक्षाचे उद्दिष्ट आहे या परिस्थितीत शिवसैनिकांनी एकजूट दाखवावे जे गद्दार सोडून गेले त्यांचा विचार न करता सर्व सामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याचे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले.

चुंबळे, साबळे गैरहजर

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते. मात्र, सिडको विभागातील श्यामकुमार साबळे व शिवाजी चुंबळे गैरहजर राहिले. साबळे हे खनिज मंत्री दादा भुसे यांच्या जवळचे असल्याने त्यांची भूमिका गृहीत धरली जात आहे, तर चुंबळे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT