Shiv Sena convention public meeting well arranged in tight security Secret Branch alert with special teams  esakal
नाशिक

Nashik Police : शिवसेनेच्या अधिवेशन, जाहीर सभेसाठी चोख बंदोबस्त! विशेष पथकांसह गोपनीय शाखा सतर्क

या अधिवेशनासाठी माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटूंब, तसेच पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेनेच्या उबाठा गटाचे राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये होते आहे. या अधिवेशनासाठी माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटूंब, तसेच पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान पक्षातील फाटाफुटीनंतर शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाकडूनही निदर्शने, आंदोलने करण्याची शक्यता गृहित धरून शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

ठाकरे गटाचे अधिवेशन व जाहीर सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिसांकडून दोन्ही गटांवर बारकाईने नजर ठेवून आहेत. (Shiv Sena convention public meeting well arranged in tight security Secret Branch alert with special teams Nashik Police)

नाशिकमध्ये शिवसेनेच्या उबाठा गटाचे राज्यव्यापी महाअधिवेशन होत असून, यासाठी माजी मुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य व तेजस ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते, खासदार, आमदार नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

ठाकरे कुटूंबियांच्या हस्ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात महापूजा व सायंकाळी गोदातिरी गोदावरीची महाआरती करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मंगळवारी (ता. २३) त्र्यंबकरोडवरील हॉटेल ड्रेमोक्रॉसी याठिकाणी राज्यव्यापी महाअधिवेशन होते आहेत. यासाठी शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तसेच, त्र्यंबक रोडवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेतर्फे सुमारे १५० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त सज्ज ठेवला आहे. तसेच, सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथेही उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होते आहे.

यावेळी नागरिकांची गर्दीची शक्यता आहे. त्यासाठी, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, ७० सहायक निरीक्षकांसह २५० पोलीस अंमलदार व होमगार्ड असा बंदोबस्त तैनात असणार आहे.

तसेच, विशेष शाखांसह गोपनीय शाखांचे पोलीस अंमलदार यासंबंधित घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विशेषत: शिंदे गटाकडून निदर्शने, आंदोलने होण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीकोनातूनही पोलीस करडी नजर ठेवून आहेत.

असा आहे बंदोबस्त

पोलीस उपायुक्त - १

सहायक आयुक्त - १

पोलीस निरीक्षक - ४

सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक - ७०

पोलीस अंमलदार -२१०

वाहतूक पोलीस - १५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारचा 'आनंदाचा शिधा' बंद शक्यता, कारण काय?

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT