Satyabhama Gadekar Sakal
नाशिक

शिवसेनेच्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनाने निधन

गाडेकर या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख होत्या.

अंबादास शिंदे

नाशिक रोड : शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख व नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर (Satyabhama Gadekar) यांचे रविवारी (ता. ९) रात्री कोरोनामुळे (Coronavirus) निधन झाले. त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. (Shiv Sena corporator Satyabhama Gadekar dies by corona)

गाडेकर या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख होत्या. त्या तीन वेळा नगरसेविका झाल्या. पहिली निवडणूक त्यांनी १९९२ मध्ये लढवली होती. त्यात त्या विजयी झाल्या. त्यानंतर २००७ मध्ये सुभाष रोड परिसरात त्या पुन्हा नगरसेविका झाल्या. त्यानंतर २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक २२ मधून त्या पुन्हा नगरसेविका झाल्या. त्यांच्या मागे पती लक्ष्मण गाडेकर, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. त्यांनी नाशिक रोड परिसरात विविध विकासकामे केली.

लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे निधन झाले. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका असलेल्या सत्यभामा गाडेकर यांनी शिवसेना पक्षामध्ये विविध महत्त्वाची पदे भूषविली. त्या अतिशय लढवय्या नेत्या होत्या. नागरिकांच्या प्रश्नांवर अतिशय आक्रमकपणे भूमिका घेत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या नेहमी तत्पर असायच्या. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी तत्पर असलेले एक लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने गाडेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय गाडेकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना करतो.

(Shiv Sena corporator Satyabhama Gadekar dies by corona)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT