पान-३ ॲंकर
YEO26B27474
येवला : शिवसेनेतर्फे गोरगरिबांना शिधावाटप करताना आमदार किशोर दराडे, युवा नेते कुणाल दराडे, तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके, रिझवान शेख, विशाल परदेशी आदी.
------------------
शिवसेनेकडून पाच हजार गरजूंना दिवाळीचा शिधा वाटप
-----------
आमदार किशोर दराडे : येवल्यात वाड्या-वस्त्यांवर जाऊन पोचविला मदतीचा हात
-------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१२ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गोरगरीब आणि गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या सामाजिक भावनेतून उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शहर व तालुक्यात पाच हजार गोरगरीब, गरजू कुटुंबाला साखर, तेल, मैदा, रवा, बेसन या वस्तूंचा दिवाळी शिधा वाटप करण्यात आला. अडचणीच्या काळात या कुटुंबीयांना नक्कीच दिवाळी गोड करता आली अशी प्रतिक्रिया आमदार किशोर दराडे यांनी व्यक्त केली.
शिवसेनेतर्फे तालुक्यासाठी सुमारे पाच हजार शिधा किट आले होते,त्याच्या वाटपाचा प्रारंभ करताना आमदार दराडे बोलत होते. युवा नेते कुणाल दराडे, तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके, शहरप्रमुख विशाल परदेशी, नगरसेवक रिझवान शेख, सुभाष गांगुर्डे, मोहफिज आत्तार, विजय मोरे, हितेन जावळे आदी पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील प्रत्येक गटातील स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांना सोबत घेऊन शिधावाटप करण्यात आले. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वाड्या-वस्त्यांवर जाऊन खऱ्या अर्थाने गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली. तालुक्यातील पाटोदा, नगरसूल, राजापूर, अंदरसूल, मुखेड यांसह विविध गटांमध्ये स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांच्या माध्यमातून दुर्गम वाड्या- वस्त्यांवरही प्रत्यक्ष भेट देऊन गरजू कुटुंबांना दिवाळीचा शिधा वितरित केला आहे. शहरामध्ये देखील गरजू कुटुंबांपर्यंत शिधा पोहोचविण्यात आला आहे. शिधामध्ये साखर, तेल, मैदा, बेसन पीठ, रवा, पोहे अशा गरजेच्या वस्तू देण्यात आल्या. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात कोणतेही गरजू कुटुंब मदतीपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना सामान्य जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीचा शिधा हा केवळ वस्तूंचे वाटप नसून अडचणीच्या काळात गरजूंच्या आनंदात सहभागी होण्याचा एक प्रयत्न असल्याचे यावेळी आमदार दराडे यांनी सांगितले.
तालुकाप्रमुख शेळके, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शाहू देवरे, तालुकाप्रमुख यश जगताप, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष श्रावण देवरे, अंकुश निकम, विजय कदम, मोहन वावधने, संतोष रोटे, बाळासाहेब वलटे, बाळासाहेब खानदेशी, किरण बोरणारे, ऋषिकेश दौंडे, बाळासाहेब मढवई, अंकुश आहेर, सूर्यकांत गोसावी, सुनील काळे, रावसाहेब पारखे आदी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.