नाशिक

दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार नरेंद्र दराडे :

CD
YEO26B27372 आडगाव रेपाळ : येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना माजी आमदार नरेंद्र दराडे, पांडुरंग शेळके, सरपंच गोरख जगताप व ग्रामस्थ. ------------- ३०-२ दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी ः दराडे तालुक्यातील दुष्काळी गावात जात शेतकऱ्यांना धीर सकाळ वृत्तसेवा येवला, ता.३१ : शिवसेनेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून शेतकरी हिताच्या भूमिका घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरू आहे. जिल्हा व तालुक्यात दुष्काळाची भयानक परिस्थिती असून या अडचणीच्या काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. ‘भगवा खांद्यावर शिवसैनिक दिसेल बांधावर’ ही भूमिका घेऊन शेतकऱ्यांसाठी नेहमी पुढाकार घेत राहू असे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी केले. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यात श्री. दराडे, तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके तसेच पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधत आहे. तालुक्यातील ठाणगाव, पिंपरी, आडगाव, मुरमी, कातरणी, विखरणी, निळखेडे आणि सोमठाणे या गावांना भेटी देण्यात आल्या. गावोगावी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. दुष्काळामुळे शेतीचे झालेले नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि आर्थिक अडचणी याबाबत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. दुष्काळाची तीव्रता वाढत असताना जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, तसेच शासनाकडून जाहीर होणारी दुष्काळी आर्थिक मदत तातडीने मिळावी, अशा मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या. माजी आमदार नरेंद्र दराडे आणि तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी विविध गावात शेतकऱ्यांनी मांडली. शेतकरी हितासाठी प्रशासन व शासनाकडे आम्ही आवाज उठवू असे यावेळी बोलताना श्री. दराडे,तालुकाप्रमुख शेळके यांनी सांगितले. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : पाबे घाट चढताना पावसामुळे कार घसरून दीडशे फूट दरीत कोसळली; तीन जण किरकोळ जखमी, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

शुक्राचा कन्या राशीत प्रवेश; सिंह राशीसह ४ राशींचे नशीब पालटणार! पैसा येणार, रखडलेली कामंही पूर्ण होणार

Mangalwedha News : उजनीतील एआय डेटा सेंटर प्रकल्पा बाबत विरोधकाकडून चुकीची माहिती; प्रदेश सरचिटणीस सुदर्शन यादव

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Who Is Nidhi Razdan : उमर अब्दुल्लांशी लग्न करणाऱ्या निधी राजदान कोण? त्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT