Shivsena MP Sanjay Raut  Google
नाशिक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

विक्रांत मते

नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (mp sanjay raut) चार दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, बुधवार (ता. ९)पासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा ते आढावा घेणार आहेत. रविवारी (ता. १३) नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेतील. (shiv sena mp sanjay raut will be on a four-day tour of north maharashtra)

पुढील वर्षाच्या प्रारंभी नाशिक महापालिकेची निवडणूक (Nashik Municipal Election) होणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू असतानाच उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील पक्षसंघटनेचा आढावा घेतला जाणार आहे. चारही जिल्ह्यांतील पक्षसंघटनेतील पदाधिकाऱ्यांशी राऊत चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे, लोकसभानिहाय आढावा घेणार आहेत. बुधवारी (ता. ९) खासदार राऊत नाशिकमध्ये मुक्कामी येतील. शिवसेनेच्या नगरसेविका (कै.) कल्पना पांडे व (कै.) सत्यभामा गाडेकर यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेतील. सायंकाळी पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करतील. गुरुवारी (ता. १०) दुपारी धुळे येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शुक्रवारी (ता. ११) नंदुरबार व रावेर लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शनिवारी (ता. १२) जळगावला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. रविवारी (ता. १३) नाशिक व दिंडोरीतील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.

(shiv sena mp sanjay raut will be on a four-day tour of north Maharashtra)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT