प्रभाग, शाखा स्तरावर जबाबदाऱ्यांचे वाटप
मध्य नाशिकमध्ये शिवसेनेची (उबाठा) मोर्चेबांधणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाने संघटनात्मक बांधणीला गती दिली आहे. प्रभाग आणि शाखा स्तरावर जबाबदाऱ्यांचे वाटप करत पक्षाने आठ प्रभागप्रमुख आणि चौदा शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात यासंदर्भात आढावा बैठक झाली. जिल्हा संपर्क उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत बूथस्तरापासून संघटना बळकट करणे, मतदारांशी सातत्याने संपर्कात राहणे आणि स्थानिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेण्याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. सध्या निवडणुकांचे वातावरण तापू लागले असताना मध्य नाशिकमध्ये संघटनात्मक फेररचनेवर पक्षाने भर दिला आहे. मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविणे आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न मांडणे, ही जबाबदारी आता या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर असणार आहे.
बैठकीला उपनेते दत्ता गायकवाड, नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, जिल्हा सचिव नीलेश साळुंखे, लोकसभा संघटक ऋषी वर्मा, विशेष निमंत्रित बाळासाहेब कोकणे, उपजिल्हाप्रमुख सचिन बांडे, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख सुनील जाधव, महानगर संघटक संजय परदेशी, विधानसभा प्रमुख मंदार बर्वे, मयूर परदेशी, विधानसभा संघटक विलास घोलप यांच्यासह साबी सिंग, श्याम कंगले आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
---
असे आहेत प्रभाग, शाखाप्रमुख
रतिलाल जोशी, सुनील भालेकर, हरीश निमसे, महेश धोंडे, नीलेश करपे, मनोज पाईकराव, प्रवीण भोळे आणि राधे गुजर यांच्यावर प्रभागप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संबंधित प्रभागात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे काम ते पाहणार आहेत. शाखाप्रमुख : शाखा स्तरावर बबलू सूर्यवंशी, प्रमोद जोशी, गुलाब वाघमारे, अमोल कुंभकर्ण, कादीर शेख, सुभान मणियार, पवन दरोडे, धनंजय कानडे, शुभम गाडे, तेजस खैरे, शाहरुख पटेल, उदय जोशी, कुणाल जोशी आणि आदिना यांची शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.