Sudhakar Badgujar esakal
नाशिक

Nashik Political : महासभेचे नोटिफिकेशन नसल्याने बेकायदेशीर : शिवसेनेचे बडगुजर यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

Nashik Political : महासभा घेण्यापूर्वी आठ दिवस अगोदर वर्तमानपत्राच्या माध्यमातून अधिसूचना काढणे बंधनकारक आहे.

परंतु महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून एकदाही अधिसूचना न काढल्याने झालेल्या ३२ महासभा बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. (Shiv Sena thackeray group sudhakar Badgujar statement alleges Mahasabha is illegal nashik political news)

नाशिक महापालिकेची मुदत १५ मार्च २०२२ ला संपुष्टात आली. त्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू झाली. प्रशासकीय राजवटीत आत्तापर्यंत ३२ महासभा झाल्या. तत्कालीन आयुक्त कैलास जाधव, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व बुधवारी (ता.२१) भाग्यश्री बानाईत यांच्या अध्यक्षतेखाली एक महासभा पार पडली.

कुठलीही सभा घेताना आठ दिवस अगोदर वर्तमानपत्रातून अधिसूचना जारी करावी लागते. त्यात महासभेचे विषय मांडवे लागतात. मात्र प्रशासकीय राजवटीत झालेल्या ३२ महासभेमध्ये एकाही महासभेची अधिसूचना काढण्यात आलेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे सर्व महासभा बेकायदेशीर ठरतात, असा आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख बडगुजर यांनी केला.

"महापालिका अधिनियमातील २९ ‘क’ या तरतुदीनुसार क्षेत्र सभेचा कार्याध्यक्ष हा बैठक बोलावतो. त्यानंतर सचिव तारीख, वेळ तसेच स्थळ निश्चिती संदर्भात बैठकीची नोटीस काढतात. त्यास विस्तृत प्रसिद्धी देणे असे नियमात म्हटले आहे. मात्र आतापर्यंत एकही महासभेची अधिसूचना काढण्यात आलेली नाही."

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना, ठाकरे गट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT