Bhujbal_Bhide 
नाशिक

Chhagan Bhujbal: "ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावं ठेवत नाहीत"; भुजबळांचा भिडेंवर निशाणा

नाशिक इथं एका शैक्षणिक संकुलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : ऐतिहासिक घटनांबाबत वारंवार वादग्रस्त विधानं करणारे संभाजी भिडे यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवत नाहीत, अशा शब्दांत भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. (Shivaji Sambhaji are not given names in Brahmin society Chhagan Bhujbal targets Sambhaji Bhide)

नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या 'समाज दिन' कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, "काही लोक म्हणतात तुम्ही इकडे तिकडे गेलात. पण आम्ही कुठेही गेलो तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही. संभाजी भिडेंचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. (Latest Marathi News)

पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खरंतर ब्राह्मण समाजानं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. पण कुठल्याही ब्राह्मण घरामध्ये कोणीही शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाहीत. हा माणुस उठूनसुठून कुणावरही टीका करत असतो. त्यामुळं इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभं राहावं लागेल" (Marathi Tajya Batmya)

आम्ही सत्तेत आलो कारण फुलेंनी तेच सांगितलं

राजक्रांतीकारकांपासून समाजक्रांतीकारकांपर्यंतचा आपला इतिहास आहे त्यांचा आदर आपण जपला पाहिजे. आम्ही सत्तेत का सामिल झालो हे मी आधीही सांगतलं आहे. महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की, सत्तेविना झाल्या सर्व कळा अवकळा. तसेच बाबासाहेबांनी देखील सांगितलं होतं शिका आणि सत्तेत सामिल व्हा. बाबासाहेब सत्तेत सामिल झाले आणि आपल्याला संविधान मिळालं"

आपले देव ओळखायला शिका

आपल्याला शिक्षण दिलं ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि कायद्यात ज्याचं पूर्ण रुपांतर केलं ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर भाऊराव पाटील आणि नंतर रावसाहेब थोरात यांनीच आपल्याला शिक्षणाची दारं उघडी करुन दिली.

पण कुणाला सरस्वती, शारदा आवडते पण आम्ही काही यांना कधी पाहिलं नाही. आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिलं नाही. पण आम्हाला ज्यांनी शिक्षण दिलं ते या लोकांनी दिलं म्हणून ते माझे देव आहेत. तेच देव तुमचे असले पाहिजेत, असं वादग्रस्त विधान पुन्हा एकदा भुजबळांनी केलं.

निवडणुकीवेळी काहीही करा पण...

जमीन खरेदी योजनेतून देणार ५० हजार रुपये देणार असल्याचं यावेळी भुजबळ यांनी सांगितलं. अनेक योजना अजित पवार तिथल्या तिथं पार पाडत आहेत. निवडणुकीवेळी काहीही करा. मात्र, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या.

आज जे सरकार आपल्याला अनुदान देतं ती मेहरबानी नाही. कारण पूर्वी शिवाजी महाराजांसारखे राजे होते तेव्हा ते अशा कामांना मदत करतच होते. आता सरकार राजे झालेत तर त्यांचं ते कामचं आहे जनतेला मदत करायचं, असही भुजबळ यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT