while handing over Shivling and Rudraksh Mal to Gaurav Ghode of Parvati Darshan Pune. esakal
नाशिक

Nashik News : श्री शंकर महाराजांकडील शिवलिंग रुद्राक्ष माळ गौरव घोडे यांच्याकडे सुपूर्द

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : श्रीक्षेत्र अंतापूर येथील श्री शंकर महाराजांचे ज्या कुटुंबाने पालन पोषण केले ते चिमणाजी हिरे यांचे वंशज पोपट हिरे यांनी महाराजांचे वास्तव्य असलेल्या घरातील त्यांनी वापरलेल्या वस्तू पुणे पर्वती दर्शनाचे गौरव घोडे यांच्याकडे सुपूर्द केल्या.

यात जिभेवरील चमत्कारी शिवलिंग व गळ्यातील रुद्राक्ष माळ कायमस्वरूपी गौरव घोडे यांच्याकडे देण्यात आली. या वस्तू घोडे परिवारात पुणे पर्वती दर्शन येथे निवासस्थानी सेवा व भाविकांच्या दर्शनासाठी देण्यात आल्या आहेत. (Shivlinga Rudraksh Mal handed over to Gaurav Ghode from Shri Shankar Maharaj Nashik News)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

अंतापुरचे श्री शंकर बाबांनी जगाच्या कल्याणासाठी पृथ्वीभ्रमण केली. भक्तांचा उद्धार करत त्यांना चमत्कार दाखविले. शंकर बाबा बाळ रुपात असताना चिमणाजी हिरे यांनी त्यांचा १३ वर्ष स्वतः सांभाळ केला.

लहान असताना स्वामी समर्थांनी बाबांच्या जिभेवर शिवलिंग ठेऊन अभिषेक केला. ते शिवलिंग व रुद्राक्ष माळ आजही अस्तित्वात आहे.

अंतापुरात बाबांनी जमिनीतून शिवलिंग, नंदी, गणपती, हनुमान आदी मूर्त्या काढल्याची आख्यायिका आहे. अंतापूर परिसरात बाबांच्या अवताराची महिमा जुन्या जाणकारांना परिचित आहे.

शंकर महाराजांचे अवतार कार्य श्रीक्षेत्र अंतापूर येथून सुरू झाले व त्यांचा अंतिम प्रवास समाधी रुपात श्रीक्षेत्र धनकवडी पुणे येथे झाला. आजही बाबा भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतात असे श्री. घोडे यांनी सांगितले. शिवलिंग व रुद्राक्ष माळेचे भाविकांनी दर्शन घ्यावे असे आवाहनही श्री. घोडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT