shiv sena aggressive on smart city company works esakal
नाशिक

गावठाणातील अपूर्ण रस्त्यांच्या कामावरून Shivsena आक्रमक

विक्रांत मते

नाशिक : स्मार्टसिटीअंतर्गत (Smart City) शहरातील गावठाण भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे (Road Construction) सुरू आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसापासून कामे बंद असून, ठेकेदार काम करत नसल्याचे उत्तर स्मार्टसिटी कंपनीकडून मिळत असल्याने या विरोधात शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली आहे.

स्मार्टसिटी कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिला. (Shivsena aggressive over incomplete road work in villages smart city company will close nashik Latest Marathi News)

स्मार्टसिटीअंतर्गत गावठाण भागात काँक्रिटीकरण, रस्ते, ड्रेनेजलाइन तसेच पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्या मोठ्या प्रमाणात खोदण्यात आले आहे. गोळे कॉलनी, घारपुरे घाट येथे काँक्रिट करणाची मागणी नसताना स्मार्टसिटी कंपनीने काम सुरू केले.

मात्र, अद्यापपर्यंत या रस्त्यांची कामे झालेली नाही. यासंदर्भात स्मार्टसिटी कंपनीकडे विचारणा केल्यानंतर ठेकेदार काम करत नसल्याचे कारण दिले आहे. ठेकेदार का काम करत नाही, याचा खुलासा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पावसाळ्यात अगोदरच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक, पार्किंगचा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागते.

अशा परिस्थितीत रस्त्यावर खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे साचलेल्या पाण्यामुळे अपघात होऊ शकतात. या सर्व प्रकाराला स्मार्टसिटी कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे तातडीने कामे पूर्ण करावी अन्यथा शिवसेना स्मार्टसिटीच्या कारभाराविरोधात जनआंदोलन उभारेल.

स्मार्टसिटी कंपनीने सुरू केलेली कामे वेळेत पूर्ण न झाल्यास कार्यालयाला टाळे लावल्याशिवाय राहणार नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

"ठेकेदार काम करत नाही, हे स्मार्टसिटी कंपनीकडून मिळालेले उत्तर चुकीचे आहे. का काम करत नाही, याचा खुलासा व्हावा अन्यथा जनआंदोलन उभारू."

- अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेता, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार सौम्य वाढीसह तेजीत; मात्र आयटी निर्देशांक लाल रंगात; आज कोणते शेअर्स वाढले?

'चित्रपटांपेक्षा पॉपकॉर्न महत्त्वाचा!' मराठी सिनेमांसाठी मिळणाऱ्या कमी स्क्रीनबाबत माधुरी दीक्षितने व्यक्त केली खंत

Vijay Hazare Trophy : रोहित शर्माच्या सुरक्षेत मोठी चूक; बॉडिगार्डना चकवून 'तो' हिटमॅनजवळ पोहोचला अन्... माजी कर्णधार चिडला Video

Viral Video Tarabai Memorial : औरंगजेबाला गाडणाऱ्या ताराराणींचे पन्हाळ्यावर स्मारक का नाही? सर्वपक्षीय नेत्यांना चॅलेंज देणारा व्हिडिओ...

'आई-वडिलांचं 'ते' भांडण ठरलं शेवटच' इन्फ्लुएन्सर वीरु वज्रवाड याची अंगावर काटा आणणारी काहाणी!

SCROLL FOR NEXT