बाळा कोकणे
बाळा कोकणे Sakal
नाशिक

Shivsena: शिवसेनेच्या बाळा कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर काल रात्री अकराच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते जबर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अज्ञात हल्लेखोरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

(Shivsena Bala Kokne Attack)

नाशिक येथील एमजी रोडवरून रात्री अकराच्या सुमारास ते जात होते. ते दुचाकीवरून जात असताना यशवंत व्यायामशाळेजवळ अज्ञातांनी त्यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते जबर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले आहेत. त्यानंतर तेथील स्थानिकांनी कोकणे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार चालू असताना पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेत अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी शेवाळे यांच्यावर झालेला हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की इतर काही कारणामुळे झाला हे कारण अजून समोर आलं नाही. याप्रकरणी अधिक तपास भद्रकाली पोलिस करत आहेत.

सध्या शिवसेनेतील अंतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेत दोन गट पडले असून या हल्ल्यामागे याचा काही संबंध आहे का? किंवा दुसरे काही कारण आहे यासंबंधी तपास सुरू असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT