Mahavitaran esakal
नाशिक

Mahavitaran Rate Hike : बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक! महावितरणकडून महागाईच्या आगीत तेल

सकाळ वृत्तसेवा

Mahavitaran : वाढलेले जीवनावश्यक वस्तुंचे दर, घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, शिक्षण व आरोग्यावरील खर्च आदींमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असतानाच महावितरणने वीज दरवाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

आता त्यात पुन्हा अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या स्वरूपात महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेव का भरायची? याचे मात्र कुठलेही कारण न देता, पूर्वसूचना न देता थेट बिलात रक्कम आकारण्यात आली आहे. (Shock of additional security deposit with bill Mahavitaran rates hike nashik news)

आधीच देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज सर्वात महाग आहे. तरीही महावितरणने तुटीची भरपाई करण्यासाठी वीज दरवाढ करण्याच्या मागणीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (एमईआरसी) कडे केला होता. यावर्षी एप्रिलच्या एक तारखेपासूनच वीज दरवाढ लागू झाली.

मे महिन्यापासून मोठा आर्थिक फटका बसणे सुरू होणार आहे. सरासरी २१ टक्क्यांवर वीज दरवाढ करण्यात आल्याचे ग्राहक संघटनेचे म्हणणे आहे. एवढी प्रचंड वीज दरवाढ ग्राहकांवर लादली असतानाही अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावावर पुन्हा ग्राहकांकडून पैसे लुबाडण्याचा प्रकार करीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

यापूर्वी सुरक्षा ठेवीची रक्कम एका महिन्याच्या बिलाइतकी होती. मात्र, नवीन नियमांनुसार एप्रिल २०२२ पासून ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरण ग्राहकांवर आर्थिक ओझ्यांवर ओझे लादण्याचा प्रकार करीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

वास्तविक ९९ टक्के ग्राहक नियमितपणे वीज बिल भरतात तर उर्वरित केवळ १ टक्का ग्राहक नियमितपणे वीज भरत नाही. जे बिल भरत नाही अशांचा पुरवठा महावितरण खंडित करते. असे असतानाही सरसकट सर्वांसाठीच सुरक्षा ठेवीची रक्कम घेतली जात आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

केवळ १ टक्के लोकांसाठी ९९ टक्के लोकांचा बळी घेतला जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष बाळा बनकर आदींसह बहुतांश ग्राहकांनी सुरक्षा ठेवीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांना या महिन्यात पाचशे ते दोन हजाराच्यावर अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल पाठविण्यात आले आहे. ही रक्कम वीज वापराच्या सरासरी इतकी आहे.

पिंपळगाव बसवंत विभागाकडून घरगुती, वाणिज्य ग्राहकांची संख्या ११ हजार तर औद्योगिक ग्राहकांची संख्या २ हजार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या ग्राहकांकडील सुरक्षा ठेवीची रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. ही कोट्यवधींची रक्कम ग्राहकांच्या खिशातून वसूल केली जाणार आहे.

"एक महिन्याची अतिरिक्त सुरक्षा ठेव आधी होती. यंदा त्यात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. ग्राहकांना सुरक्षा ठेव भरायचे बंधनकारक नसावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल."

- ज्ञानेश्वर चव्हाण(जिल्हा सरचिटणीस,काँग्रेस)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार म्हणजे 'देशी ब्रिटिश', असिम सरोदेंच्या निलंबनावरून ठाकरे गट आक्रमक....

Kartik Purnima 2025: दिवे दान केल्याने माता लक्ष्मी अन् भगवान विष्णू कसे प्रसन्न होतात? जाणून घेऊया सविस्तरपणे

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा ऑलिंपिक मार्ग खडतर; ४९ किलो वजनी गटाला कात्री, आता ५३ किलोत खेळावे लागणार

Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT