नाशिक

उपाेषणकर्त्याला जबरदस्तीने खाऊ घातली बिर्याणी; चौघांना अटक

CD
उपाेषणकर्त्याला जबरदस्तीने खाऊ घातली बिर्याणी; चौघांना अटक सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २९ : येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ २२ ऑक्टोबरपासून कंक्राळे येथील सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ हाके विविध मागण्यांसाठी उपोषण करीत आहेत. ते गुरुवारी (ता. २९) उपोषण मागे घेणार होते. मात्र मध्यरात्री चौघा मद्यपींनी त्यांच्याकडे येऊन त्यांना बळजबरीने बिर्याणी खाऊ घातली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. येथे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ हाके शेती यांसह विविध मागण्यांसाठी २२ ऑक्टोबरपासून उपोषण करीत आहेत. गुरुवारी श्री. हाके उपोषण मागे घेणार होते. यासंदर्भात पाेलिसांशी चर्चा झाली होती. त्यामुळे ते बुधवारी रात्री अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झोपलेले असताना त्यांच्याजवळ शुभम नंदकिशोर बावीस्कर, हर्ष देविदास वाघ, चेतन सुनील भुसे, प्रेम प्रविण अहिरे हे चौघेजण आले. हाके यांना म्हणाले, की उपोषण सोडून घे. व त्यांना बिर्याणी खाऊ घातली. श्री. हाके शुद्ध शाकाहारी आहेत. त्यामुळे त्यांना उलट्या झाल्या. त्यांनी आरडाओरड केली. परिसरातील नागरीक जमा झाले. काही वेळेतच छावणी पोलिस घटनास्थळी आले. चौघा भामट्यांनी हाके यांची साउंड सिस्टिम चोरून नेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला व चौघांना काही तासांतच अटक केली. त्यांच्याविरुद्ध छावणी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Latest Marathi News Update: कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत होणार

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

SCROLL FOR NEXT