होळनांथे येथे
एकास मारहाण
शिरपूर : केळीच्या झाडाला धक्का लावून नुकसान केल्यावरून चौघांनी एकास मारहाण करून जखमी केले. ही घटना ३० सप्टेंबरला सायंकाळी सहाला होळनांथे (ता. शिरपूर) येथे घडली. काशीनाथ भाईदास भोई (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित राहुल सुरेश भोई, सुरेश शांताराम भोई, मनोज नामदेव भोई व सुनील सुरेश भोई (सर्व रा. होळनांथे) यांनी हाताबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांना जखमी केले. थाळनेर पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, हवालदार राजेंद्र भिल तपास करीत आहेत.
बालिकेचा विनयभंग
शिरपूर : शाळेत जाणाऱ्या बालिकेस उचलून नेत तिचा विनयभंग केल्यावरून एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना १ ऑक्टोबरला सकाळी पावणेअकराला घडली. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात आठवर्षीय बालिका शाळेत जात असताना, गावातील संशयिताने तिला उचलून घरात नेले व विनयभंग केला. संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक जितेंद्र महाजन तपास करीत आहेत.
सुळे येथून
दुचाकीची चोरी
शिरपूर : सुळे (ता. शिरपूर) येथून शेतकऱ्याच्या राहत्या घरासमोरुन दुचाकी चोरीस गेली. ही घटना ७ ते ८ सप्टेंबरदरम्यान घडली होती. सांगवी पोलिस ठाण्यात १ ऑक्टोबरला संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला. प्रवीण नारायण गायकवाड (वय ४०, रा. सुळे) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १८, एआर १७४३) असून, तिची किंमत ३० हजार रुपये आहे. उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट तपास करीत आहेत.
धारबर्डी येथे घरफोडी
शिरपूर : धारबर्डी (सांगवी, ता. शिरपूर) येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने व मोबाईल, असा एकूण ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना २६ सप्टेंबरला दुपारी १२ ते चारदरम्यान घडली. रणजित पुट्या पावरा (वय २७) यांच्याकडे ही घरफोडी झाली. संशयितांनी ७० भार चांदीचे वेले आणि मोबाईल लोखंडी कपाटातून काढून नेला. सहायक उपनिरीक्षक सतीश वाणी तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.