नाशिक

शिरपूर : गुन्हे वार्ता

CD
मजुरास मारहाण; पाच हजार चोरले शिरपूर : घराबाहेर उभ्या मजुराला मारहाण करून त्याचे पाच हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. ही घटना ३० ऑक्टोबरला रात्री साडेआठला खर्दे बुद्रुक (ता. शिरपूर) येथील तपनभाई पटेल हॉस्पिटलमागे पत्र्यांच्या खोल्यांजवळ घडली. तोहीत पद्म रसूल शेख (वय ३५, रा. पश्चिम बंगाल) असे मारहाण झालेल्या मजुराचे नाव असून, तो सध्या खर्दे येथे वास्तव्यास आहे. घराबाहेर तांदूळ घेण्यासाठी आला असता, पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमधून उतरलेल्या चौघांनी त्याला हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण करीत त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलच्या कव्हरमध्ये शेख याने पाच हजार रुपये ठेवले होते. मोबाईलसह रोकड घेतल्यानंतर संशयितांनी शेख याचा बचाव करण्यासाठी आलेल्या भुराराम शर्मा यालाही मारहाण केली. तेथून चोरटे पसार झाले. शेख याच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, हवालदार रवींद्र आखडमल तपास करीत आहेत. कोडीद येथून दुचाकी लंपास शिरपूर : कोडीद (ता. शिरपूर) येथून घराबाहेर लावलेली स्कूटी चोरीस गेली. ही घटना ३० ऑक्टोबरला रात्री साडेअकराला घडली. मायादेवी सुनील बाविस्कर (वय ५३, रा. कोडीद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीची स्कूटी (एमएच १८, सीएम ७९४१) संशयितांनी चोरून नेली. तिची किंमत ७० हजार रुपये आहे. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हवालदार रूपेश गांगुर्डे तपास करीत आहेत. बोराडी येथे दुचाकी चोरी शिरपूर : बोराडी (ता. शिरपूर) येथील शशांक रंधे यांची स्कूटी (एमएच १८, सीके ५१२८) ३० ते ३१ ऑक्टोबरदरम्यान चोरट्यांनी नेली. तिची किंमत ६० हजार रुपये आहे. सांगवी पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून, हवालदार सागर ठाकूर तपास करीत आहेत. गळफास घेऊन युवकाची आत्महत्या शिरपूर : महामार्गालगत शहादा चौफुलीजवळ गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. ही घटना १ नोव्हेंबरला घडली. राहुल कन्साराम पावरा (वय १८) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रकाश चंपालाल जैन याच्या शेताच्या बांधावर बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास लावलेला त्याचा मृतदेह आढळला. थाळनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, हवालदार संजय धनगर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

Lanja Machal ST Bus Service Historic Event : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर कोकणातील ३५०० फूट उंचीवरील दुर्गम 'माचाळ' गावात पहिल्यांदाच धावली लालपरी

मला लहानपणापासूनच लग्न करायचं होतं पण... अजूनही अविवाहित का आहे ३४ वर्षांची वैदेही परशुरामी? म्हणते- मी प्रेमात पडले...

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

FD Rates: सरकारी बँकेने FD वरील व्याजदर वाढवले; नवीन योजनाही सुरू! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार इतकं व्याज, दिवाळीआधी गुंतवणुकीची संधी?

SCROLL FOR NEXT