young man beaten manmad.png 
नाशिक

VIDEO : भयंकर प्रकार! निर्दयीपणे 'ते' तरुणाला भरचौकात मारत होते..अन् व्हिडीओ झाला व्हायरल.. 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मनमाड : पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील असल्याचं सांगितलं जात आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये...

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ११ जणां विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर पोलिसांनी ७ जणांना बेड्या ठोकल्या. या व्हिडीओमध्ये किती अमानुषपणे मारहाण केली आहे. भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेसंदर्भात सध्या पोलिसांकडून चौकशी करत आहेत तर ४ फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तरुणावर स्थानिक रुग्णालयात उपचार

दोन गटात गेल्या काही वर्षां पासून वाद होता. हा वाद इतका विकोपाला गेला की ३-४ जणांनी मिळून या एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे यांनी दिली. काठ्यानी एका टोळक्याने तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मनमाडच्या डॉ. आंबेडकर चौकात घडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT