नाशिक

गोळीबार प्रकरणातील दोघा संशयीतांना अटक

CD
गोळीबार प्रकरणातील दोघा संशयितांना अटक महिलेवर गोळी झाडल्याचे प्रकरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : प्रियकरासोबत दुचाकीवर जात असलेल्या महिलेवर गोळीबार करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील संशयित जखमी महिलेच्या प्रियकराचा भाऊ असून, त्याला दोघांचे संबंध मान्य नसल्याने त्याने ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. जुने जळगाव गोपाळपुरा येथे वास्तव्यास असलेल्या संगीता बुधा बारेला (वय ३५) या महिलेचे रोहन मधुकर सपकाळे (वय ३०) याच्याशी प्रेमसंबंध असून या प्रेमसंबंधाला रोहनच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध आहे. यातून मंगळवारी (ता.२०) विजयादशमीच्या दिवशी संगीता बारेला ही महिला रोहनसोबत दुचाकीवरुन जात असताना दोघांचा पाठलाग करून जुनेस्थानकासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. जखमी संगीता बारेला या महिलेवर जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या जबाबावरून शहर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात निरीक्षक सागर शिंपी यांच्या गुन्हेशोध पथकाने रोहनचा भाऊ अनिकेत मधुकर सपकाळे (रा.पिंप्राळा) व त्याचा साथीदार दीपक भरत धनगर (रा.पिंप्राळा) अशा दोघांना अटक केली आहे. उपनिरीक्षक सावित्री ढगे तपास करीत आहेत.

Manoj Jarange: ''माझ्याकडेही एक क्लिप आहे.. पिंपरी चिंचवड...'', अजय बारस्कर यांच्याकडून जरांगे पाटलांच्या चारित्र्यावर संशय

Naming Controversy: ट्रम्प यांची सटकली! आता म्हणताहेत 'अटलांटिक महासागरालाच माझे नाव द्या!'

ABHISHEK SHARMA : पहिल्याच बॉलवर सिक्स मारताच अभिषेक शर्माच्या नावावर मोठा विक्रम; शफिकुल्लाहचा रेकॉर्ड मोडला, सूर्या कितव्या नंबरवर?

'माझ्यावर होणाऱ्या मीम्सवर मीही हसतो'; सचिन पिळगांवकर ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...'ही माझी पोरं'

Latest Marathi News Live Update : पुढची ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागणार नाही...! अमित शाह यांचा राहुल गांधीवर निशाणा

SCROLL FOR NEXT