Shouting slogans due to maratha reservation in mpsc examination centre in defiance of police nashik esakal
नाशिक

Nashik News : पोलिसांना न जुमानता परीक्षा केंद्राजवळ घोषणाबाजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी मुख्य परीक्षा होती. जिल्हा न्यायालयासमोरील बिटको हायस्कुल हे परीक्षा केंद्र होते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी मुख्य परीक्षा होती. जिल्हा न्यायालयासमोरील बिटको हायस्कुल हे परीक्षा केंद्र होते.

याठिकाणी असलेल्या शिवतिर्थावर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने जल्लोषकर्त्यांनी डीजे लावून घोषणाबाजी सुरू केली. (Shouting slogans due to maratha reservation in mpsc examination centre in defiance of police nashik news)

त्यावेळी पोलिसांनी त्यांना परीक्षा सुरू असल्याचे सांगूनही त्याठिकाणी असलेल्या वक्ता व त्याचे पदाधिकारी पोलिसांनाही जुमानत नसल्याचे दिसून आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) रविवारी मुख्य परीक्षा होती. सकाळी ९ ते १२ आणि दिव्यांगांसाठीचा ९ ते १ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते ५ अशी परीक्षेची वेळी होती.

स्मार्ट रोडवरील जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या बिटको हायस्कुलमध्ये एमपीएससी परीक्षार्थींची परीक्षा होती. शेकडो परीक्षार्थी या केंद्रावर पेपर लिहित होते. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने शहरातच नव्हे तर राज्यात जल्लोष करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सकल मराठी समाजातर्फे रविवारी (ता. २८) सकाळी ११ वाजत जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या शिवतीर्थांवर आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

जल्लोषकर्त्यांनी यावेळी एका वाहनातून डीजेही आणला होता. त्यांनी तो सुरू करताच परीक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत तो बंद केला आणि एमपीएससीची परीक्षा आहे. पेपर संपल्यानंतर त्यांना काही वेळात जल्लोष आटोपून जाण्यास सांगितले. परंतु, १२ च्या सुमारास स्वयंघोषित नेता आला आणि त्याने माईकचा ताबा घेत भाषणबाजी तर केलीच, त्यानंतर घोषणाबाजी करीत डीजेच्या तालावर जमलेल्यांनी तालही धरला.

परंतु त्यावेळी परीक्षा केंद्रामध्ये दिव्यांग परीक्षार्थी पेपर लिहित होते. पोलिसांनी संबंधितांना आवाज कमी करण्याचा आणि कमी आवाजात घोषणाबाजी करण्याच्या सूचना करूनही कोणीही पोलिसांना जुमानत नसल्याचेच दिसून आले. यामुळे काही परीक्षार्थींनी नाराजीही व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT