फोटो : H31237
श्रद्धा शृंगारपुरे यांना डॉ. पवार स्मृती पुरस्कार
रावसाहेब थोरात हॉलमध्ये बुधवारी वितरण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३ : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा ‘डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. निलवसंत मेडिकल फाउंडेशन ॲन्ड रिसर्च सेंटरच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
७ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता रावसाहेब थोरात हॉल, गंगापूर रोड, नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरस्कार समितीच्या अध्यक्षा नीलिमा पवार यांच्या हस्ते शृंगारपुरे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. निलवसंत मेडिकल फाउंडेशन ॲन्ड रिसर्च सेंटर ही सामाजिक संस्था असून, कै. डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून २००९ मध्ये तिची स्थापना झाली. शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचा या पुरस्कारासाठी गौरव केला जातो.
---चौकट
संघर्षातून समाजसेवेपर्यंतचा प्रवास
पालघर जिल्ह्यातील मोखाड्यासारख्या दुर्गम आदिवासी भागात पाणीटंचाई, बालविवाह, शिक्षणातील तफावत आणि स्थलांतराच्या प्रश्नांवर काम करत श्रद्धा शृंगारपुरे यांनी समाजसेवेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी मुंबईसारखे शहर सोडून आदिवासी समाजात काम करण्याचा निर्णय घेतलेल्या श्रद्धा यांनी पाणी, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाला आपल्या कार्याचे केंद्र बनविले. शृंगारपुरे आणि त्यांचे पती राहुल तिवरेकर यांनी २०१७ मध्ये ‘दिगंत स्वराज्य फाउंडेशन’ची स्थापना केली. वयाच्या दहाव्या वर्षापासून शिकवणी, दुकान आणि हॉटेलमध्ये काम करून त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. स्वातंत्र्यसैनिक असलेल्या आजी-आजोबांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा आणि प्रत्यक्ष अनुभवातून आलेली संवेदनशीलता त्यांच्या कार्याची प्रेरणा ठरली.
---कोट
फोटो : H31238
आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते; मात्र आदिवासींचे जीवन उंचावणे आणि त्यांना सक्षम करणे हेच माझे ध्येय झाले.
-श्रद्धा शृंगारपुरे, दिगंत स्वराज्य फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.