Organ Donation esakal
नाशिक

Organ Donation : अवयवदानाविषयी जागृतीसाठी उद्यापासून श्रेष्ठदान महाअभियान; दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवयवदानाविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि अवयवदान, देहदानाविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी नाशिकमध्ये शनिवारी (ता. १८) व रविवारी (ता. १९) ‘श्रेष्ठदान महाअभियान’ हे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे.

‘मविप्र’च्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात होणाऱ्या या अधिवेशनाचे उद्‍घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होईल. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवारांच्या उपस्थितीत रविवारी समारोप होईल. (Shresthadan Maha Abhiyan from tomorrow to raise awareness about organ donation Second State Level Convention nashik news)

अवयवदानाविषयी राज्यभर विविध ठिकाणी काम करणाऱ्या संघटनांनी एकत्रितपणे मृत्युंजय ऑॅर्गन फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून अवयवदानाची चळवळ चालवली जाते.

त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये ‘श्रेष्ठदान महाअभियान’ होत असल्याची माहिती संघटनेचे संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे, संयोजक सुनील देशपांडे, फेडरेशन आॉफ आॉर्गन अॅन्ड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, अशोक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन दिवसांच्या महाअभियानात शनिवारी सकाळी नऊ ते दहा या वेळेत जिल्हा रुग्णालय ते शालिमारमार्गे रावसाहेब थोरात सभागृहापर्यंत प्रभातफेरी निघणार आहे. सकाळी अकराला पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते व ‘मविप्र’चे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन होईल.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

दुपारी एक ते सव्वादोनपर्यंत होणाऱ्या चर्चासत्रात सुनील देशपांडे, डॉ. रवींद्र कुटे, डॉ. भाऊसाहेब मोरे विचार मांडतील. दुपारच्या सत्रात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ विचार मांडतील.

सायंकाळी ‘महादानाची लोकधारा’ या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत लोकगीतांमधून अवयवदानाची जनजागृती करण्यात येणार आहे. रविवारीही विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि दुपारी दोनला समारोप होईल. यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे प्रमुख पाहुणे असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT