टुडे पान ३, मेन फिचर
--
NSK26H34873
जळगाव : श्रीराम वहनोत्सवातील पहिल्या अश्व वहनाच्या मिरवणुकीपूर्वी पूजन करताना मंगेश महाराज जोशी
–––
NSK26H34874
वहनावर ठेवलेली प्रभू श्रीरामांची उत्सव मूर्ती.
–––
रामनामाच्या जयघोषात श्रीराम वहनोत्सवास प्रारंभ
(उपशीर्षक)
ग्रामनगरीत चैतन्य; दहा दिवस वहन मिरवणुकीसह पानसुपारी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे दरवर्षी साजरा केला जात असलेल्या श्रीराम वहनोत्सवाला कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून वेदमंत्र आणि रामनामाच्या जयघोषात प्रारंभ झाला. दहा दिवसांच्या उत्सवात वेगवेगळे वहन ग्रामप्रदक्षिणेला काढले जातील. यानंतर कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी श्रीराम रथोत्सव साजरा होईल. यामुळे पुढील दहा– बारा दिवस ग्रामनगरीत उत्सव व चैतन्याचे वातावरण अनुभवण्यास मिळेल.
जळगावच्या जुन्या गावातील रामपेठेतील प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर ग्रामदैवत मानले जाते. श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी शुद्ध प्रतिपदेपासून वहनोत्सव साजरा होत असतो. त्यानुसार १० नोव्हेंबरला घोडा वहनाने उत्सवाची सुरवात झाली. मंदिराचे गादीपती ह. भ. प. मंगेश महाराज जोशी यांच्याहस्ते अश्व वहनाचे पूजन करून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ब्रह्मवृंद मंडळींच्या वेदमंत्र आणि रामनामाच्या जयघोष करत वहन मिरवणुकीला सुरवात झाली. यानंतर हत्ती, वाघ, सिंह, श्री सरस्वती, चंद्र, शेषनाग, श्री सूर्य, श्री गरुड, श्री मारुती असे वहने निघणार आहेत.
काकडआरतीने सुरवात
वहनोत्सवातील प्रथम वहन घोड्याचे १० नोव्हेंबरला निघाले. यापूर्वी पहाटे पाचला काकडारती होऊन पुजाअभिषेक, मंगलारती, सकाळी ७ ते ८ रामप्रहर महिला मंडळ (रामपेठ) यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ व सामुदायिक रामजप झाला. तर सकाळी साडेदहाला निमखेडी शिवारातील श्रीराम मंदिर येथे पालखी गेली. येथे प्रभू श्रीरामांची उत्सव मूर्तीस व श्रीसंत मुक्ताबाईंच्या पादूकांना जलाभिषेक पूजन श्री सद्गुरू अप्पा महाराजांच्या गुरुतुल्य (श्रीक्षेत्र वाघोड, ता.रावेर) येथील सदगुरू श्री कुंवरस्वामी महाराजांची पुण्यतिथीनिमित्त भजन, आरती, महाप्रसाद होऊन पालखी दुपारी चारला श्रीराम मंदिरात परत आली. यानंतर सायंकाळी सहाला वहनाची पूजा होऊन मिरवणुकीला सुरवात झाली.
भजन-भारूडांची रंगत
जलग्राम प्रदक्षिणा घालताना ठिकठिकाणी वहनात पानसुपारीचे मानकरी असलेल्या भक्तांकडे भजन-भारूड, पानसुपारीचा कार्यक्रम रंगेल. तर वहन ज्या मार्गाने जाईल, त्या मार्गावर भाविकांनी सडासंमार्जन करून रांगोळ्या काढून व वहनास आरती देऊन स्वागत देखील केले. दहा दिवस ग्रामनगरीत हा उत्सव पाहावयास मिळेल. तर कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला रथोत्सव साजरा झाल्यानंतर कार्तिकी शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सवाचा समारोप होईल.
––––––––––
इन्फो
आजचे वहन सिंहाचे
श्रीराम वहनोत्सवात चौथे वहन सिंहाचे आहे. जंगलाचा राजा सिंह. आयाडीने सुशोभित असणारा. उद्या (ता.१३) सायंकाळी सातला सिंह वहनाचे पूजन होऊन वहन ग्रामप्रदक्षिणेस मार्गस्थ होईल. यानंतर पहिली पानसुपारी खेडी रोड येथील पवन दशरथ कोळी, दुसरी डीएनसी महाविद्यालयाजवळ श्री महादेव मंदिर येथे भालचंद्र चौधरी यांच्याकडे होईल. तर तिसरी पानसुपारी कार्यक्रम दीपक अत्तरदे यांच्याकडे होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.