पान तीन ॲंकर
-------------
06974, 06975
सटाणा : शंकर महाराजांचे सजवलेल्या प्रतिकृती. दुसऱ्या छायाचित्रात महाराजांची रांगोळी.
सटाण्यात श्री शंकर महाराजांचा प्रकट दिन उत्साहात
रांगोळी ठरली मुख्य आकर्षण; सामूहिक सहभागातून एकोप्याचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. १७ : येथील शांतीनगर परिसरातील श्री शंकर महाराज मंदिरात सद्गुरू श्री शंकर महाराजांचा प्रकट दिन सोहळा विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात विधिवत महाभिषेक, विशेष पूजाअर्चा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
प्रकट दिनानिमित्त आयोजित सर्व धार्मिक विधींचे पौरोहित्य गौरांग जोशी यांनी केले. महाभिषेक आणि पूजाविधी सुरू असताना भाविकांनी केलेल्या महाराजांच्या जयघोषामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. पूजाविधी झाल्यानंतर आयोजित केलेल्या महाप्रसादाचा परिसरातील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने आस्वाद घेतला.
या भक्तिमय सोहळ्याप्रसंगी जोगड महाराज (पुणे), तन्मय जोशी, ॲड. नितीन चंद्रात्रे, ॲड. सतीश चिंधडे, अजय राका, डॉ. शैलेश सोनवणे, मंगेश शुक्ल, केवळ कापडणीस, राजेंद्र बागड, विकी टाटिया, अशोक सोनवणे यांच्यासह शांतीनगर परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकट दिन सोहळ्याच्या यशस्वितेसाठी राहुल चंद्रात्रे, गौरव जोशी, हरीश निकम यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले. शांतीनगरवासीयांच्या सामूहिक सहभागातून धार्मिक उत्साह आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत सोहळा उत्साहात झाला.
------------
आकर्षक रांगोळीने वेधले भाविकांचे लक्ष
या प्रकट दिन सोहळ्यात विशेष आकर्षण ठरली ती डॉ. रोहन मोरे यांनी साकारलेली श्री शंकर महाराजांची हुबेहूब आणि आकर्षक रांगोळी. रांगोळीच्या माध्यमातून साकारलेले महाराजांचे सुबक आणि जिवंत भासणारे चित्र मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे लक्ष वेधून घेत होते. उपस्थितांनी या कलाकृतीचे तोंडभरून कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.