Shri shri Ravi Shankar News
Shri shri Ravi Shankar News esakal
नाशिक

Shri Shri Ravishankar: मोदी सत्तेत येण्यापूर्वी काशी, केदारनाथ, राममंदिर दुर्लक्षित : श्री श्री रविशंकर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता येईपर्यंत देशातील काशी विश्वेश्वर, केदारनाथ व अयोध्येतील राम मंदिर हे दुर्लक्षित झाले होते. अयोध्येतील राम मंदिराच्या जागेबाबत योग्य तोडगा निघावा म्हणून मी आठ महिने सातत्याने या प्रकरणाचा अभ्यास केला. खटल्याशी संबंधित व्यक्तींना भेटून त्यांच्याशी चर्चा केली.

अखेर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आणि आता अयोध्येत भव्य राममंदिर साकारले जात आहे, असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी आज येथे केले. (Shri Shri Ravi Shankar on pm narendra modi at samuhik ramraksha at nashik news)

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे मंगळवारी (ता. २८) त्र्यंबकेश्वर रोडवरील ठक्कर डोम येथे ‘ज्ञानगंगा’ हा भक्तिमय सोहळा पार पडला. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या सानिध्यात महासत्संग व सामूहिक श्रीरामरक्षापठण करण्यात आले.

या प्रसंगी १२ ते १५ हजार भाविक उपस्थित होते. या वेळी श्री श्री रविशंकर महाराज म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराच्या संदर्भातील खटला सुरू झाला तेव्हा न्यायाधीशांच्या विनंतीनुसार या खटल्यात सहभाग घेतला.

माझ्यासोबत अन्य दोन न्यायाधीश होते. १८ मोठे बॉक्सनी भरलेल्या या खटल्याचा अभ्यास करण्यासाठी तब्बल दोन वर्षे लागली असती. परंतु आम्ही आठ महिने दररोज आठ ते दहा तास याचा अभ्यास केला. त्याच्याशी निगडित व्यक्तींना भेटलो.

त्यांच्याशी चर्चा केली. अखेर २००३ मध्ये ठरल्याप्रमाणे पंचक्रोशीबाहेर प्रार्थनास्थळ उभारण्यासाठी पाच एकर जागा देण्याचा निर्णय झाला. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिल्यानंतर आता राममंदिर उभे राहात आहे, असे श्री श्री रविशंकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, रामायण व महाभारताचा केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रभाव आहे. आठ हजार वर्षांनंतरही हा प्रभाव दिसून येतो. अन्न आणि आनंद मिळविण्यासाठी मशागत करावी लागते. ही मशागत म्हणजे ध्यान आणि प्राणायाम आहे. यातून आपल्या मनातील नकारात्मक विचार बाहेर पडतील.

सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे म्हणजेच ज्ञानगंगा होय. ही ज्ञानगंगा प्रवाही ठेवण्यासाठी सकारात्मक ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा आपल्याला गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातून मिळत असते. जीवन आनंद आहे.

अन्न व आनंद मिळविण्यासाठी मनुष्य जीवन जगत असतो. ज्ञानगंगा वाहत असली तरी त्याची आपण कदर करत नाही. त्यामुळे नाशिकमध्ये सुरू झालेल्या ज्ञानगंगेचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा, असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी केले. हासत्संग सुरू होण्यापूर्वी उपस्थित सर्वांनी रामरक्षास्त्रोत्र म्हटले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

नकारात्मकतेमुळे ४० सेकंदाला एक आत्महत्या

नकारात्मक विचार मनुष्याचे जीवन संपवतो. अमेरिकेत चार व्यक्तींमागे एक व्यक्ती दुःखी दिसतो. ४० सेकंदात एक व्यक्ती आत्महत्या करत आहे.

पैसा असूनही त्यांच्या जीवनात आनंद नाही म्हणून हे घडते. जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रत्येकाने गीता वाचली पाहिजे. सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी नियमितपणे ध्यान व प्राणायाम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री श्री रविशंकर म्हणतात...

- जीवन नश्वर आहे, एका क्षणात होत्याचे नव्हते होईल

- मिळालेले जीवन आनंदी जगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे

- राजाश्रय व दैवाश्रयावर आधारित जीवन

- इंग्रजी भाषेतील ७० टक्के शब्द संस्कृत भाषेतील

- गुढीपाडव्यालाच आपले नवीन वर्ष सुरू होते

- ज्ञान, ध्यान आणि गाण्यापासून आत्मबल वाढते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT