नाशिक

पं. श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी

CD
फोटो - NSK26H33788 शब्दब्रह्माचा अपौरुषेय महामेरू : पं. श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी ---------------------------------------------------- भारतीय वैदिक परंपरेचे विशेषत्वाने शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन संहिता पदक्रम जटाघनपाठापर्यंत शतपथ ब्राह्मण व दशग्रंथांसहित गुरु शिष्य परंपरेने, संवर्धन, अध्ययन अध्यापन आणि प्रसार करणाऱ्या महान विभूतींमध्ये वैदिक सम्राट दशग्रंथी पंडित श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी यांचे स्थान अत्यंत गौरवपूर्ण आहे. वेदविद्या, शास्त्राध्ययन आणि भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. पं. गोडशे गुरुजी यांच्या जन्मशताब्दी सांगता महोत्सवानिमित्त... - वेदाचार्य रवींद्र पैठणे वेद ही भारतीय संस्कृतीची अमूल्य ज्ञानसंपदा असून, तिचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गोडशे गुरुजींनी आपल्या विद्वत्तेच्या आणि साधनेच्या बळावर वैदिक परंपरेचा गौरव वाढविला. अचूक घनांत अध्ययन शेवटच्या श्वासापर्यंत तेजस्वी असलेली वेद विद्या दशग्रंथी म्हणून प्राप्त केलेली त्यांची विद्वत्ता, वेदांप्रति असलेली निष्ठा आणि धर्मशास्त्रातील अधिकार यांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व विद्वत्समाजासाठी आदर्श ठरले. ‘शब्दब्रह्माचा अपौरुषेय महामेरू’ ही उपाधी त्यांच्या वैदिक ज्ञानाच्या उत्तुंगतेची आणि साधनेच्या महानतेची जाणीव करून देते. वेदांचे अध्ययन केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून, ते जीवनाला शिस्त, संस्कार आणि आध्यात्मिक दिशा देणारे माध्यम आहे, हा विचार त्यांच्या कार्यातून अधोरेखित होतो. त्यांच्या जन्मशताब्दी सांगता महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे म्हणजे वैदिक संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला वंदन करणे होय. अशा महापुरुषांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, वेदाध्ययनाची आवड निर्माण करणे आणि गुरुपरंपरेचा सन्मान राखणे ही काळाची गरज आहे. गोडशे गुरुजींचे जीवन म्हणजे ज्ञाननिष्ठा, तपश्चर्या आणि संस्कृतीसेवेचा प्रेरणादायी आदर्श होय. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून वैदिक ज्ञानपरंपरेच्या संवर्धनाचा संकल्प करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. (महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान नाशिकचे संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News : पालघरमध्ये प्रकल्पविरोधी संघर्ष पेटणार! ५२ संघटनांचा प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार, ३० ऑक्टोबरला जनआक्रोश सभा

Satana News : वृक्षतोड रोखा, अन्यथा जनआंदोलन; बागलाणमध्ये राष्ट्रवादीसह पर्यावरणप्रेमींचा एल्गार! माजी आमदार संजय चव्हाण यांचा इशारा

Marathi News Live Updates : नागपुरात 'अर्णब' चक्रीवादळाचा प्रभाव; ढगाळ वातावरणामुळे पावसाची हजेरी आणि हवेत गारवा!

संकट येण्याआधी मिळतात संकेत? घरातील 5 गोष्टींबाबत काय सांगते चाणक्य नीती?

Smile Day: एका स्मितहास्यामुळे बदलू शकते का संपूर्ण नाते? जाणून घ्या मानवी जीवनातील 'स्मितहास्याची' जादू!

SCROLL FOR NEXT