नाशिक

शिरपूर : बससेवा बातमी

CD
शिरपूर आगारातून जादा बसचे नियोजन शिरपूर, ता. ३ : दीपावलीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारातर्फे ४ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रासह गुजरातमधील विविध शहरांसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सुरत, बडोदा आणि अहमदाबादसह विविध मार्गांवर या बसेस धावणार आहेत, अशी माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी दिली. धुळे विभागाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे आणि विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांच्या मार्गदर्शनाखाली बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शिरपूर आगारातून पुणे, नाशिक, अलिबाग, छत्रपती संभाजीनगर, बीड, जळगाव, चोपडा, शहादा, धुळे, सुरत, अंकलेश्वर, बडोदा आणि अहमदाबाद या मार्गांवर जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे दीपावलीच्या सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ई- व्ही वातानुकूलित बसची सुविधा शिरपूर आगारातून ऑक्टोबर महिन्यापासून ई- व्ही वातानुकूलित बस सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय शिरपूर ते बोराडी, मालकातर, पानसेमल तसेच शिरपूर ते आढे, थाळनेर, मांजरोद आणि होळनांथा या मार्गांवर परिसर बससेवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील आणि स्थानक प्रमुख मनोज पाटील यांनी दिली.

Tukaram Mundhe: ''तुम्हाला चांगलं अन्न नकोय का?'' असं का म्हणाले तुकाराम मुंढे? मंत्र्यांना मुंढे का नकोसे वाटतात? दिलं उत्तर...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

MPSC Exam Inquiry: एमपीएससीच्या नऊ परीक्षांची चौकशी; राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ यादीतून वगळल्याने विद्यार्थ्यांचा सवाल

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

Adul Accident: दिवाळीचा बाजार करून परतताना अपघात; आडूळमध्ये अपेरिक्षा पलटी, एकाचा मृत्यू अन् आठ जण गंभीर

SCROLL FOR NEXT