नाशिक

शिरपूर : ई फायलिंग कार्यशाळा बातमी

CD
SHC26B13558 शिरपूर : प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्‌घाटन करताना न्या. पवन ढोरे. शेजारी पदाधिकारी. ------ ई- फायलिंगचे तंत्र आत्मसात करा ॲड. प्रशांत चौधरी : शिरपूरला वकिलांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २ : आगामी काळात न्यायालयीन कामकाज पूर्णतः पेपरलेस होणार आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या, स्वतःच्या आणि संपूर्ण न्याय व्यवस्थेच्या वेळेत बचत व्हावी या दृष्टीने वकिलांनी ई- फायलिंगचे तंत्र आत्मसात करावे, असे आवाहन मास्टर ट्रेनर ॲड. प्रशांत चौधरी यांनी केले. येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. १) वकिलांसाठी ई-फायलिंग विषयक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश पवन ढोरे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. या वेळी शिरपूर वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. व्ही. बी. पाटील, सचिव ॲड. निलेश चव्हाण, कोशाध्यक्ष ॲड. प्रवीणसिंह पाटील व संचालक उपस्थित होते. ॲड. अमोल चौधरी यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. ॲड. प्रशांत चौधरी यांनी दृकश्राव्य माध्यमे आणि स्लाइडच्या साहाय्याने ई- फायलिंगच्या विविध तांत्रिक बाबींची माहिती दिली. न्यायालयात प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने दावे, अर्ज, प्रतिज्ञापत्रे व अन्य न्यायालयीन कागदपत्रे दाखल करणे, आवश्यक कागदपत्रांच्या डिजिटल प्रती अपलोड करणे, चलन भरणे तसेच ऑनलाइन दाखल प्रक्रियेतील तांत्रिक बाबी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. ई-फायलिंगमुळे कागदाचा वापर कमी होऊन वेळेची बचत, कागदपत्रांचे डिजिटल व्यवस्थापन आणि न्यायालयीन कामकाजात सुलभता येण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणादरम्यान वकिलांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसनही ॲड. चौधरी यांनी केले. ॲड . शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शिरपूर वकील संघाच्या सदस्यांनी कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सहायक सरकारी अभियोक्ता आर. ए. पाडवी, सहायक अधीक्षक जी. एस. पांडव, वरिष्ठ लिपिक आर. एच. नागे, कनिष्ठ लिपिक ए. बी. जहिया, आर. एस. कोळी, एन. जी. सुतार, एम. जी. मलक यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

Lanja Machal ST Bus Service Historic Event : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर कोकणातील ३५०० फूट उंचीवरील दुर्गम 'माचाळ' गावात पहिल्यांदाच धावली लालपरी

मला लहानपणापासूनच लग्न करायचं होतं पण... अजूनही अविवाहित का आहे ३४ वर्षांची वैदेही परशुरामी? म्हणते- मी प्रेमात पडले...

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

FD Rates: सरकारी बँकेने FD वरील व्याजदर वाढवले; नवीन योजनाही सुरू! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार इतकं व्याज, दिवाळीआधी गुंतवणुकीची संधी?

SCROLL FOR NEXT