नाशिक

शिरपूर : पालिका वाहन लोकार्पण

CD
पान चार सेकंड मेन ----------------- 13503 शिरपूर : नूतन वाहनांचे लोकार्पण करताना नगराध्यक्ष चिंतन पटेल, उपाध्यक्षा संगीता देवरे, संजय हासवानी, माधवराव पाटील आदी. शहरातील स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम होणार चिंतन पटेल : नगर परिषदेच्या स्वच्छता, स्वर्गरथ वाहनांचे लोकार्पण सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता.१६ : शहरातील स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करतानाच नागरिकांना सार्वजनिक सेवांसाठी स्वर्गरथ वाहनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्वच्छ आणि सुंदर शिरपूरच्या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम असून नगरपालिकेच्या नागरी सुविधा विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे अशी माहिती नगराध्यक्ष चिंतन पटेल यांनी दिली. येथील नगर परिषदेच्या ताफ्यात दाखल झालेली दोन अत्याधुनिक स्वीपर वाहने आणि स्वर्गरथ वाहन यांचे लोकार्पण नगराध्यक्ष पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उपनगराध्यक्षा संगीता देवरे, बांधकाम सभापती वासुदेव देवरे, नगरसेवक माधवराव पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय हसवाणी, राजेश भोई, अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक सागर ओतारी आदी उपस्थित होते. पटेल म्हणाले की, शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेत मिळालेल्या प्रोत्साहनात्मक बक्षीस अनुदानातून दोन नवीन स्वीपर गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी नगरपालिकेकडे तीन स्वीपर मशीन आणि तीन ट्रॅक्टर माउंटेड स्वीपर मशीन उपलब्ध आहेत. आणखी दोन स्वीपर गाड्यांची भर पडल्याने शहराच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी उपलब्ध यंत्रसामग्रीत वाढ झाली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, वर्दळीची ठिकाणे आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी या गाड्यांचा उपयोग होणार आहे. रस्त्यांवरील धूळ आणि कचरा हटविण्याच्या कामाला यामुळे गती मिळण्याची अपेक्षा आहे. यांत्रिक साधनांचा प्रभावी वापर केल्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यास आणि स्वच्छता मोहिमेची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. ---------- 13503 स्वर्गरथाची सुविधा अंत्ययात्रेसाठी आवश्यक सार्वजनिक वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेच्या निधीतून स्वर्गरथासाठी नवीन चेसीस खरेदी केली असून त्यावर आवश्यकतेनुसार बॉडी बांधणी करण्यात येणार आहे. त्यानंतर हे वाहन प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहे. असे पटेल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: तिरंगा मोर्चापूर्वीच अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

YUZVENDRA CHAHAL: लग्न तुटल्यानंतर चहलला पॅनिक अटॅक, दारूचं व्यसनही जडलं! २६ दिवस रिहॅबमध्ये काय घडलं?

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

SCROLL FOR NEXT