Shubham and his parents during the initiation ceremony. 
नाशिक

Success Story: मनमाडचा शुभम जगताप सैन्यदलात लेफ्टनंटपदी

सकाळ वृत्तसेवा

Success Story: मनमाड येथील रेल्वेतील लोको पायलट मनोज जगताप यांचा मुलगा शुभम जगताप यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली आहे. देहरादू येथे नुकताच दिक्षांत सोहळा झाला. (Shubham Jagtap as lieutenant in army nashik news)

शुभमचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण मनमाड येथील केंद्रीय विद्यालयात झाले. त्यानंतर सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील सैनिक स्कुलमध्ये घेतले. त्यानंतर तो पदवीधर शिक्षणसाठी पुणे येथे गेला. फर्ग्यूसन व एचव्ही देसाई महाविद्यालयातून बी.एससीचे शिक्षण भौतिकशास्त्र विषय घेऊन केले. पदवी मिळाल्यानंतर त्याने इन्फोसिसमध्ये एक वर्षे नोकरी केली.

हा सर्व प्रवास सुरू असताना शुभमने भारतीय सेनेमध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेली सीडीएस अर्थात कम्बाइन डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन ही परीक्षा दिली. ती उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीत तो अव्वल ठरला. यानंतर ऑफीसर या पदासाठी भारतीय सैन्यात दाखल झाला.

डेहराडून इंडियन मिलीटरी अॅकेडमी येथे १८ महिन्याचे प्रशिक्षण झाल्यानतंर त्याची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली. दीक्षांत सोहळ्यात वडील मनोज जगताप व शिक्षिका असलेल्या आई वर्षा जगताप व भाऊ शिवम जगताप उपस्थित होते.

भारत मातेची सेवा घडो...

शुभमला सातारा सैनिकी स्कुलमध्ये शिकायला घातले, त्यादिवशी बघितलेलं स्वप्न आज सत्यात उतरताना बघून छाती अभिमानाने फुलून आली. आज इंडियन मिलिटरी अकॅडमीमधील जवळपास १८ महिन्यांचं खडतर असे प्रशिक्षण पूर्ण करून भारत मातेच्या रक्षणार्थ त्याचं पहिलं पाऊल टाकताना बघून मनस्वी आनंद होत आहे. त्याच्याकडून भारत मातेची सेवा घडो हीच आदिशक्तीचरणी प्रार्थना असे भावनावश होत वडील मनोज जगताप आणि आई वर्षा जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT