shubham sangale with his sir esakal
नाशिक

Nashik : निरागस आणि गोड शुभमचे दहावीत यश!

संदीप पवार

नाशिक : इयत्ता तिसरीत असताना शुभम त्याच्या आई वडील यांनी आमच्याकडे आणला. शुभमला बोलता आणि ऐकू (Mute & deaf) येत नव्हते. त्याच्या आई वडील यांच्या चेहऱ्यावर त्याच्या भविष्याची चिंता खूपच स्पष्ट दिसत होती. आपला मुलगा ऐकू शकत नाही नीट बोलू शकत नाही, हा इतर मुलांप्रमाणे होईल का? शिक्षण घेईल का? असा प्रश्न त्यांच्या समोर होता. (shubham sangale success story in ssc results nashik news)

दिव्यांग शुभम ने काढलेले अप्रतिम चित्र...

तिसरी पासून शुभम चित्रकलेचे धडे आपल्याकडे गिर वू लागला. शुभम लहानपणी खूपच चंचल होता. त्याचं मन कधीही एका गोष्टीत रमलं नाही. पण चित्रकलेने त्याला स्थिर बनविले. पुढे पुस्तकांसोबतच चित्रकलेशी त्याची गट्टी जमली. दिवस रात्र कलेची साधना शुभम करत असतो. त्याच्या घरात त्याने स्वतःचे कलादालन देखील बनविले आहे. हे फार कौतुकास्पद आहे. तिसरी ते दहावी या कालखंडात शुभम ने चित्रकला विश्वात खूप उंच झेप घेतली. त्याच्या वाट्याला खूप मान, सन्मान, बक्षिसं मिळाली. शाळेत दुर्लक्षित असणारा शुभम शाळेची ओळख बनला. त्याच्या चित्रांची प्रदर्शने भरवू लागला. यामुळे त्याचे व्यक्तीमत्त्व खूपच खूलत गेले. आज दहावीला त्याला ७४ टक्के गुण मिळाले, पहिल्यांदा घाई घाई पेढे घेऊन माझ्याकडे आला.

दिव्यांग शुभम ने काढलेले अप्रतिम चित्र...

हे चित्र डोळ्यात पाणी आणणारं होतं. या त्याच्या यशाच्या वाट्यात आपल्या सरांना तो विसरला नाही. हे खूप महत्त्वाचे आहे. एकेकाळी निराशेचा मुलगा आज आशेचा किरण बनला. त्याच्या आई वडील यांच्या डोळ्यात स्पष्ट जाणवत होतं. शुभम तुला तुझ्या उत्तुंग यशाबद्दल खूप खूप अभिनंदन. तू उद्याचा खूप मोठा कलावंत आहेस. पुढील वाटचालीस शुभेच्छा.तारे जमी पर हा सिनेमा आठवला.कला माणसाला उपजिवीकाच नाही तर त्याचं व्यक्तिमत्त्व तसेच चांगला माणूस घडविण्याचं काम करते.

श्री माध्यमिक विद्यालय सिन्नर शाळेचा विद्यार्थी आई रुपाली सांगळे,वडील रविंद्र सांगळे,आणि विशेष त्याचा लहान भाऊ कलाशिक्षक किशोर पगारे यांचा त्याला विशेष कलाशिक्षणात मार्गदर्शन केले असून शुभमला मुंबईला जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे फाईन आर्टस चे शिक्षण घ्यायचे आहे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT